राजकारण

नाथाभाऊ काय चीज आहे तुम्हाला दाखवून देऊ

संपूर्ण खान्देश राष्ट्रवादीमय होईल- शरद पवार

23 Oct :- नाथाभाऊंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने आता संपूर्ण खान्देश राष्ट्रवादीमय होईल, यात मला शंका नाही. एकदा शब्द दिला म्हणजे त्यावरून नाथाभाऊ मागे हटत नाहीत, असे गौरोद्गार काढतानाच नाथाभाऊ काय चीज आहे तुम्हाला दाखवून देऊ, असा सूचक इशारा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिला.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा, मिळवा ‘वॉटसप्पवर’ लाईव्ह अपडेटस

एकनाथ खडसे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांना पक्ष प्रवेश दिल्यानंतर केलेल्या स्वागतपर भाषणात पवार यांनी हे भाष्य केलं. खान्देश हा संपूर्ण परिसर गांधी-नेहरुंच्या विचाराचा होता. मध्यंतरी त्याला उतरती कळा लागली. या काळात नवी पिढी तयार झाली. ही पिढी घडवण्याचं काम नाथाभाऊंनी केलं. त्यांनी जिल्हा परिषद, खासदार, नगरपरिषद, पंचायत समित्या आणल्या. इतिहासाचा हा पहिला टप्पा संपला आहे. आता दुसरा टप्पा सुरू झाला आहे, असं पवार म्हणाले.

वाचा :- अतिवृष्टीग्रस्तांसाठी ठाकरे सरकारने जाहीर केले 10 हजार कोटींचे पॅकेज!

अजितदादा पवार नाराज असल्याच्या चर्चा मीडियाने चालवल्या. त्यात काही तथ्य नाही. कोरोनामुळे सहकाऱ्यांना खबरदारी घेण्यास सांगितलं आहे. अजितला ताप होता. त्यामुळे ते काळजी घेत आहे. त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चेत तथ्य नाही, असं सांगतानाच जितेंद्र आव्हाडही व्हेंटिलेटरवर असतानाही नाराजीच्या बातम्याही मीडियाने चालवल्या, असं पवार म्हणाले.

वाचा :- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ईद ‘या’ प्रकारे साजरी होणार

वाचा :-  माजी कर्णधार कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका