शरीर संबंधासाठी पतीच्या मित्रांना नकार दिल्याने विवाहितेस मारहाण!
घरमालकाने हस्तक्षेप केल्याने महिलेचा जीव वाचला
23 Oct :- महिलांवर होणाऱ्या अत्याचार वाढते प्रमाण समाजामध्ये संतापाचे वातावरण निर्माण करत आहे.आपल्या मित्रांसोबत शरीर संबंध ठेवत नाही म्हणून तिच्या पतीच्या चार मित्रांनी एका विवाहित महिलेस लोखंडी रॉड आणि पट्ट्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उरुळी कांचन मध्ये घडलीय. या घटनेनंतर पाच जणांविरोधात विनयभंगाचा गुन्हा लोणी काळभोर पोलिस स्टेशनमधे दाखल करण्यात आला आहे.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा, मिळवा ‘वॉटसप्पवर’ लाईव्ह अपडेटस
दौंड तालुक्या सहजपुर येथील दाम्पत्य सध्या उरुळी कांचन येथे भाड्याच्या घरात राहत होते. पीडित महिलेच्या पतीचे मित्र नेहमीच घरात येत होते. रात्री अकरा वाजता त्यांच्या घरी आले आणि त्यांनी त्या महिलेला शरीर संबंधाची मागणी करून पीडित महिलेशी भांडू लागले. मात्र पीडित महिलेने शरीर संबंधास नकार देत विरोध केला. त्यामुळे तिच्या पतीने व चार मित्रांनी तिला लोखंडी रॉडने आणि पट्ट्याने मारहाण केली. यामध्ये पीडित महिला जखमी झाली आणि त्यानंतर ते चार जण निघून गेल्यावर तिच्या पतीने तिला पुन्हा मारहाण करण्यास सुरुवात केली.
वाचा :- अतिवृष्टीग्रस्तांसाठी ठाकरे सरकारने जाहीर केले 10 हजार कोटींचे पॅकेज!
घरातला गोंधळ ऐकून घरमालक तिथे आला आणि त्याने हस्तक्षेप केल्याने त्या महिलेचा जीव वाचला. हा अन्याय असह्य झाल्याने पीडित महिलेने आपल्यावर झालेल्या अत्याचाराविरुध्द लोणी काळभोर पोलिसात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन चौधरी तपास करीत आहेत.
वाचा :- मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले पॅकेज फसवे
या विकृत पती आणि त्याच्या नराधम मित्रांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी महिला संघटनांनी केली आहे. राज्यात महिलांवरच्या अत्याचारांमध्ये वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
वाचा :- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ईद ‘या’ प्रकारे साजरी होणार