महाराष्ट्र

राज्यात धावत्या कोरोना गाडीचा वेग मंदावला

महाराष्ट्राचे कोरोना अपडेट!

23 Oct :- राज्यात वेगाने धावणाऱ्या कोरोनाच्या गाडीचा वेग सध्या चांगलाच मंदावला आहे. रोज रुग्णवाढीपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची वाढती संख्या पाहावयास मिळत आहे. रुग्णवाढ जरी आटोक्यात येत असली तरी कोरोना विषाणूचा संसर्ग होणार नाही असे म्हणणे चुकीचे ठरणार आहे. नवरात्र, दसरा, ईद, दिवाळी अशी मोठंमोठी सण काही दिवसांवरच आली आहेत. त्यामुळे नागरिक खरीदीकरीता बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहेत.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसप्पवर’ लाईव्ह अपडेटस

तोंडावर मास्क नसताना, सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवत नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. म्हणूनच सध्या आटोक्यात येत असलेला कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती वाढली आहे. राज्यात कोरोना रुग्णांच्या घसरणीचा वेग कायम आहे. सलग काही दिवसांपासून संख्या घटत असून त्यामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे. दिवसभरात 13 हजार 247 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. त्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या ही 14 लाख 45 हजार 103 एवढी झालीय. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88.52 टक्क्यांवर गेला आहे.

वाचा :- मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले पॅकेज फसवे

गेल्या 24 तासांमध्ये 7 हजार 347 नव्या रुग्णांच भर पडली. तर 184 जणांचा मृत्यू झाला. राज्याचा मृत्यू दर हा 2.63 एवढा झाला आहे. राज्यात सध्या एकूण 1 लाख 43 हजार 922 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

वाचा :- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ईद ‘या’ प्रकारे साजरी होणार

वाचा :- माजी कर्णधार कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका