राजकारण

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले पॅकेज फसवे

देवेंद्र फडणवीस यांनी केली टीका!

23 Oct :- राज्यात अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात झालेल्या नुकसानीसाठी भरपाई म्हणून 10 हजार कोटी रुपये राज्य सरकारने जाहीर केले आहेत. यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला शब्द फिरवत आज जाहीर केलेले पॅकेज हे अतिशय फसवे असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसप्पवर’ लाईव्ह अपडेटस

सोशल मीडियाच्या माध्यमातून आजच्या पॅकेजवर फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. बळीराजाला अतिशय तोकडी मदत देताना, त्यांनी निव्वळ बहाणे शोधले. शेतकर्‍यांचे झालेले प्रचंड नुकसान पाहता त्यांनी जाहीर केलेली मदत ही तोंडाला पाने पुसणारी आहे.

वाचा :- अतिवृष्टीग्रस्तांसाठी ठाकरे सरकारने जाहीर केले 10 हजार कोटींचे पॅकेज!

यापूर्वी ₹25,000 आणि 50,000 रूपये हेक्टरी मदतीची मागणी त्यांनीच केली होती. फळबागांसाठी तर एक लाखांपर्यंत मदत त्यांनी मागितली होती. पण, आता ती मदत द्यायची नाही, म्हणून केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलण्याचा केविलवाणा प्रयत्न ते करीत आहेत. नियमित अर्थसंकल्पातील आकड्यांनाच पॅकेज भासवून मलमपट्टी केल्याचा आव सरकार आणू पाहत आहे. पण, केवळ देखावा निर्माण करून शेतकर्‍यांना अजिबात मदत मिळणार नाही. बहाणेबाजी करून महाविकास आघाडी सरकारने शेतकर्‍यांची घोर निराशा केली, फसवणूक केली.

वाचा :- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ईद ‘या’ प्रकारे साजरी होणार

किमान शेतकर्‍यांच्या बाबतीत तरी आणि झालेल्या नुकसानीची तीव्रता पाहता अशा काल्पनिक आकड्यांची धूळफेक मुख्यमंत्री करतील, असे वाटले नव्हते. हा शेतकर्‍यांसोबत झालेला मोठा विश्वासघात आहे. निसर्गाने तर अन्याय केलाच, आता सरकारही सूड घेत आहे.

वाचा :-  माजी कर्णधार कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका

वाचा :- कांद्याच्या किमतीला लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारने उचललं पाऊल