राजकारण

खडसेंच्या राजीनाम्यानंतर उपमुख्यमंत्र्यानी दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच नवे बळ,ऊर्जा मिळाली

23 Oct :- गेल्या अनेक वर्षांपासून पक्षामध्ये दुय्यम वागणुकीमुळे नाराज असलेले एकनाथ खडसेंनी राजीनामा सेट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रेवेश केला. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर पक्षातल्या सर्वच नेत्यांनी खडसे यांचं स्वागत केलं आहे. खडसे यांच्यामुळे पक्षाला बळ असेल अशी सर्वांची भावना आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसप्पवर’ लाईव्ह अपडेटस

या प्रतिक्रिया येत असताना सगळ्यांना प्रतिक्षा होती ती अजित पवारांच्या प्रतिक्रियेची. कारण अजित पवार नाराज आहेत अशी चर्चा सोशल मीडियावर होत होती. त्यानंतर मुख्य कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनीही त्यावर सविस्तर खुलासा केला. नंतर अजित पवारांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. अजित पवार म्हणाले, राज्याचे ज्येष्ठ नेते, माननीय एकनाथरावजी खडसे साहेबांचे मी राष्ट्रवादी पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो. मा.खडसेसाहेब आणि रोहिणीताईंच्या पक्षप्रवेशानं राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच नवे बळ, ऊर्जा मिळाली आहे.

वाचा :-  माजी कर्णधार कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका

खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात पक्षवाढीसाठी त्यांच्या नेतृत्वाचा निश्चितच उपयोग होईल. खडसेसाहेब, रोहिणीताई खडसे, त्यांच्यासह पक्षप्रवेश केलेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे पक्षामध्ये हार्दिक स्वागत! पक्षात आपल्या ज्येष्ठत्वाचा, अनुभवाचा निश्चित सन्मान होईल, असा विश्वास देतो असंही अजित पवारांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे. कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले, काही लोक अजित पवार नाराज आहेत अशी चर्चा करत आहे.

वाचा :- ठाकरे सरकारने घेतला हा मोठा निर्णय

अजित पवार हे नाराज असण्याचं काहीही कारण नाही. फक्त कोरोनाचं संकट असल्याने काळजी घ्यावी लागते, त्यामुळे ते घरी आहेत असं सांगत त्यांनी चर्चेला विराम जेण्याचा प्रयत्न केला. पवार म्हणाले, गेले काही दिवस फक्त नाथाभाऊ हाच विषय माध्यमांमध्ये होता. आज आता वेगळाच विषय काढला की अजित पवार नाराज आहेत म्हणून, पण नाराजी असण्याचं काहीच कारण नाही.

वाचा :- भारतात लवकरच लॉन्च होणार 5G नेटवर्क

वाचा :- भारत- अमेरिकेची होणार 26 तारखेला मोठी बैठक