अतिवृष्टीग्रस्तांसाठी ठाकरे सरकारने जाहीर केले 10 हजार कोटींचे पॅकेज!
ठाकरे सरकारचा मोठा निर्णय!
23 Oct :- ठाकरे सरकार म्हणजे हक्काचे सरकार या विधानाला लक्षात ठेवत ठाकरे सरकार शेतकऱ्यांना भरभक्कम पाठिंबा देण्यासाठी संकटकाळात उभा राहिले आहे.राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. नुकसान झालेल्या भागात मुख्यमंत्र्यांनी स्वतः जाऊन नुकसानीची पाहणी करून शेतकरी माय-बापासाठी मोठ्या आर्थिक मदतीचा हात दिला आहे. यामुळे राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मोठा दिलासा दिला आहे.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसप्पवर’ लाईव्ह अपडेटस
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अतिवृष्टीग्रस्तांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. राज्य सरकार ही मदत नुकसानग्रस्तांना तातडीने वितरित करणार असल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीर केले. यासोबतच राज्याचे केंद्राकडे 38 हजार कोटी थकीत आहेत. केंद्राने अजूनही ही रक्कम दिली नाही असेही मुख्यमंत्री म्हणाले. दिवाळीपर्यंत ही मदत देण्यात येणार आहे. सणासुदीत बळीराजाच्या डोळ्यात अश्रू येऊ देणार नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
वाचा :- माजी कर्णधार कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, या आपत्तीत 10 हजार कोटी रुपये मदत देण्याचे निश्चित केले आहे. यात रस्त्यांची दुरुस्ती, शेतजमिनीची दुरुस्ती व इतर नुकसान भरपाईचा समावेश आहे. पैशाची ओढाताण आहे, पण शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही हा आमचा शब्द आहे.
वाचा :- ठाकरे सरकारने घेतला हा मोठा निर्णय
जिरायत, बागायत जमिनीसाठी 6800 प्रति हेक्टर ही केंद्राची मदत अपुरी आहे त्यामुळे आम्ही ती प्रति हेक्टरी 10 हजार दोन हेक्टरच्या मर्यादेत देणार आहे. फळपिकांसाठी 18,000 रुपये प्रति हेक्टर ऐवजी 25 हजार रुपये प्रति हेक्टर मदत दिली जाईल.