कांद्याच्या किमतीला लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारने उचललं पाऊल
केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी
23 Oct :- गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्यांच्या डोळ्यात कांद्याने पाणी आणलं आहे. कांद्याच्या किंमतीमध्ये अचानक मोठी वाढ झाली आहे. आता कांद्याच्या वाढत्या किमतीला लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारने पाऊल उचललं आहे. केंद्र सरकारने विविध राज्यांना त्यांच्या गरजेनुसार, कांदा पुरवठा केला असल्याचं सांगितलं आहे.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसप्पवर’ लाईव्ह अपडेटस
आजपासून कांद्याची साठा मर्यादा लागू करण्यात आली आहे. याबाबत केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. घाऊक विक्रेत्यांसाठी साठा मर्यादा 25 मेट्रिक टन आणि किरकोळ विक्रेत्यांसाठी 2 मेट्रिक टन, करण्यात आल्याची माहिती लीना नंदन यांनी दिली आहे. त्यामुळे आता दुकानदार केंद्राने दिलेल्या नियमांनुसारचं कांद्याची साठवण करू शकणार आहे.
वाचा :- माजी कर्णधार कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका
कांद्याच्या किंमतींमध्ये काही प्रमाणात स्थिरता राखण्यासाठी आतापर्यंत 35 हजार मेट्रिक टन कांदा राज्यांना देण्यात आल्याची माहिती, ग्राहक व्यवहार सचिव लीना नंदन यांनी सांगितलं आहे. कांद्याचं उत्पादन वाढवण्यासाठी सतत कृतीशील पावलं उचलली गेली आहेत.
वाचा :- भारतात लवकरच लॉन्च होणार 5G नेटवर्क
परंतु सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून तुलनेने स्थिर असलेल्या किंमतीतमध्ये वाढ झाली आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि कर्नाटकात झालेल्या पावसामुळे कांद्याच्या भावात वाढ झाल्याचं केंद्राकडून सांगण्यात आलं आहे.