भारत

माजी कर्णधार कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका

तातडीने केले रुग्णालयात दाखल!

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसप्पवर’ लाईव्ह अपडेटस

23 Oct :- भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. वृत्तानुसार, कपिल देव यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत दुखू लागल्यामुळे कपिल देव यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

वाचा :- दसरा मेळाव्यासाठी पंकजाताईंनी कार्यकर्त्यांना केले आवाहन

हृदयात ब्लॉकेज असल्यामुळे त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. डॉक्टरांच्या मते, याक्षणी कपिल देव धोक्याच्या बाहेर आहेत. त्यांच्यावर डॉक्टर लक्ष ठेवून असून आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. क्रिकेटच्या इतिहासात कपिल देव यांचे नाव सुवर्ण अक्षरात लिहिले आहे.

वाचा :- ठाकरे सरकारने घेतला हा मोठा निर्णय

कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतानं 37 वर्षांपूर्वी पहिला वर्ल्ड कप जिंकला होता.दरम्यान, लॉकडाऊनमध्ये आपल्या नव्या लुकमुळे कपिल देव चर्चेत होते. त्यांनी कपिल देव यांनी मुंडन करून केवळ दाढी ठेवली होती. कपिल देव यांच्या या लुकचे कौतुक सेलिब्रिटीजनेही केले होते.

वाचा :- भारतात लवकरच लॉन्च होणार 5G नेटवर्क

वाचा :- लस दिल्यानंतर या कारणामुळे झाला 5 जणांचा मृत्यू