सिनेमा,मनोरंजन

हृतिक रोशनची आई कोरोनाच्या घेऱ्यात

वाढदिवसा दिवशीच कोरोना टेस्ट आली पॉझिटिव्ह

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसप्पवर’ लाईव्ह अपडेटस

22 Oct :- हिंदी चित्रपट सृष्टीला लोकप्रिय अभिनेता हृतिक रोशनची आई पिंकी रोशन यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या 67 व्या वाढदिवशी म्हणजे गुरुवारी ही बातमी समोर आली. त्यांना लक्षणे असिम्प्टमॅटिक आहेत. सध्या त्या पती राकेश रोशन यांच्यासोबत खंडाळ्यात आहेत.

वाचा :- दसरा मेळाव्यासाठी पंकजाताईंनी कार्यकर्त्यांना केले आवाहन

जिथे त्यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कर्मचा-यांची दर 20 दिवसाला कोरोनाची चाचणी केली जाते. त्यांचा मागील कोरोनाचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला. गुरुवारी पिंकी रोशन यांनी वयाची 67 वर्षे पूर्ण केली. यानिमित्ताने त्यांच्या मुलांनी त्यांना खोलीच्या बाहेर सरप्राईझ गिफ्ट दिले.

वाचा :- ठाकरे सरकारने घेतला हा मोठा निर्णय

ज्याचा सोशल मीडियावर फोटो शेअर करून त्यांनी उल्लेख केला आहे. शुक्रवारी पिंकी यांची आणखी एक चाचणी होईल. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह येईल, अशी त्यांना आशा आहे. या आयसोलेशनच्या काळात पिंकी यांच्यासह त्यांच्या आई, मुलगी सुनयना आणि नात सुनारिका या खंडाळ्यातील त्यांच्या घरी आहेत.

वाचा :- भारतात लवकरच लॉन्च होणार 5G नेटवर्क

वाचा :- राज्यात 16 हजारापेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त