महाराष्ट्र

राज्यात 16 हजारापेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त

महाराष्ट्राचे आजचे कोरोना अपडेट!

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसप्पवर’ लाईव्ह अपडेटस

22 Oct :- राज्यात कोरोना विषाणूचा वाढत प्रादुर्भाव आटोक्यात येत आहे. तर कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या दिलासा देत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असला तरी नागरिकांनी खबरदारी घेणे अत्यावशक आहे. तोंडाला मास्क, सोशल डिस्टन्स, आणि गर्दी करणे आणि विनाकारण गर्दीमध्ये जाणे टाळल्यास नकीच कोरोना विषाणूचा संसर्ग आँखो मोठ्या प्रमाणात आटोक्यात येईल.

वाचा :- दसरा मेळाव्यासाठी पंकजाताईंनी कार्यकर्त्यांना केले आवाहन

गेल्या 8 महिन्यापासून कोरोनाशी झुंजणाऱ्या महाराष्ट्रासाठी गेल्या काही दिवसांपासून येत असलेली आकडेवारी काहीशी दिलासा देणारी आहे. राज्याचा हा 88 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. गुरुवारी 16 हजार 177 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्य ही 16 लाख 31 हजार 856 एवढी झाली आहे.

वाचा :- ठाकरे सरकारने घेतला हा मोठा निर्णय

राज्यात दिवसभरात 7 हजार 539 नवीन रुग्णांचे निदान झालं. तर 198 रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यू दर हा 2.64 टक्के एवढा झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 84 लाख 2 हजार 559 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 16 लाख 25 हजार 197 म्हणजे 19.34 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 50 हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

वाचा :- भारतात लवकरच लॉन्च होणार 5G नेटवर्क

वाचा :- भारत- अमेरिकेची होणार 26 तारखेला मोठी बैठक