खडसेंचं शरद पवारच ठरवतील!
जयंत पाटील यांनी केले विधान!
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसप्पवर’ लाईव्ह अपडेटस
22 Oct :- ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश आता निश्चित झाला आहे. त्यानंतर चर्चा सुरू झाली ती त्यांच्या मंत्रिपदाबाबत. खडसे यांची ज्येष्ठता लक्षात घेता त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाईल अशी चर्चा आहे. यावर बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, खडसे यांचं पुनर्वसन कसं करायचे ते शरद पवार ठरवतील, अफवा नको, ज्यावेळेस प्रवेश करण्याचे ठरविले जाते त्यावेळेस हे निर्णय होत असतात. त्यामुळे शरद पवार काय निर्णय घेतात याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.
वाचा :- दसरा मेळाव्यासाठी पंकजाताईंनी कार्यकर्त्यांना केले आवाहन
राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज शरद पवारांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यात विधान परिषद पदवीधर निवडणुकीवर चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली. यावर तीन पक्ष चर्चा करणार आहे. सेनेचे सुभाष देसाई आणि थोरात यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर निर्णय होईल असंही पाटील यांनी सांगितलं.
वाचा :- ठाकरे सरकारने घेतला हा मोठा निर्णय
एकनाथ खडसे यांच्या समवेत त्यांच्या काही संस्थेतील लोक प्रवेश करतील, जळगांव, धुळे, नंदुरबार जिल्हातले काही लोक प्रवेश करतील असंही ते म्हणाले. अजित दादांना थोडी सर्दी होती.
वाचा :- भारतात लवकरच लॉन्च होणार 5G नेटवर्क
कोरोना झाला का याबाबत नेमकी माहिती नाही असंही त्यांनी सांगितलं. उदयनारजे भोसले यांच्या शुभेच्छा फडवणीस आणि चंद्रकांत पाटील यांनी कशा घ्यायच्या हे ठरवायचं आहे असा टोलाही त्यांनी लगावला.
वाचा :- भारत- अमेरिकेची होणार 26 तारखेला मोठी बैठक
वाचा :- ठप्प पडलेलं क्रिकेट सुरू होणार; इंग्लंडची टीम भारत दौऱ्यावर येणार!