बीड

सुखद! आज बीडमधून 98 रुग्ण झाले कोरोनामुक्त

बीड जिल्ह्याचं सविस्तर कोरोना अपडेट!

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसप्पवर’ लाईव्ह अपडेटस

22 Oct :- बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीमध्ये होत असलेली घट आणि कोरोनामुक्त होत असलेल्या रुग्नांची वाढती संख्या आता बीडकरांना दिलासा देत आहे. आरोग्य विभागाच्या अथक परिश्रमामुळे जिल्ह्यात रुग्णवाढ आटोक्यात येत आहे. मात्र नागरिकांनी निष्काळजीपणा केल्यास नक्कीच कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पुन्हा पसरू शकतो.

वाचा :- बीड कोरोना ब्रेकिंग! आज 128 रुग्ण पॉझिटिव्ह!!

कोरोना विषाणूची भीती बाजूला ठेवून योग्य ती ‘खबरदारी’ घेतल्यास नक्कीच कोरोनाशी लढा देता येतो हे स्पष्ट होऊ लागले आहे. शरीरामध्ये सौम्य लक्षण आढळताच त्वरित नागरिकांनी डॉक्टरांशी संपर्क करणे आवश्यक आहे. मात्र नागरिक डॉक्टरांच्या परस्पर मनानेच मेडिकलवर जाऊन दैनंदिन गोळ्या-औषंधाची खरेदी करून कोरोना दुखणं अंगावर काढत आहेत.

वाचा :- ठाकरे सरकारने घेतला हा मोठा निर्णय

आज बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्यने रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत बीड जिल्ह्यात एकूण 12643 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आजची बीड जिल्ह्यामधील कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या दिलासा देणारी आहे. आज बीड जिल्ह्यातून तब्बल 98 रुग्णांना कोरोनमुक्तीची पावती मिळाली आहे.

वाचा :- लस दिल्यानंतर या कारणामुळे झाला 5 जणांचा मृत्यू

आजवर बीड जिल्ह्यातून एकूण 396 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रेट 11.02% आहे. तर रिकव्हरी रेट 86.26 % एवढा आहे.
त्यामुळे नागरिकांनो घाबरू नका…मास्क वापरा…सोशल डिस्टन्स ठेवा…गर्दी टाळा काळजी घ्या!

वाचा :- भारत- अमेरिकेची होणार 26 तारखेला मोठी बैठक

वाचा :- ठप्प पडलेलं क्रिकेट सुरू होणार; इंग्लंडची टीम भारत दौऱ्यावर येणार!