राज्यात 23 हजारापेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त!
रुग्णवाढ आटोक्यात! मात्र खबरदारी अत्यावशक!!
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसप्पवर’ लाईव्ह अपडेटस
21 Oct :- राज्यात कोरोना विषाणूचा वाढत प्रादुर्भाव आटोक्यात येत आहे. तर कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या दिलासा देत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असला तरी नागरिकांनी खबरदारी घेणे अत्यावशक आहे. तोंडाला मास्क, सोशल डिस्टन्स, आणि गर्दी करणे आणि विनाकारण गर्दीमध्ये जाणे टाळल्यास नकीच कोरोना विषाणूचा संसर्ग आँखो मोठ्या प्रमाणात आटोक्यात येईल.
वाचा :-लस दिल्यानंतर या कारणामुळे झाला 5 जणांचा मृत्यू
राज्यात कोरोना रुग्णांचा आलेख घसरणीला लागला असून त्यात सलग काही दिवस घट आहे. बुधवारी दिवसभरात उच्चांकी 23,371 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्यांची एकूण संख्या ही 14,15,679 एवढी झाली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट हा 87.51 टक्के एवढा आहे. गेल्या २४ तासांमध्ये 8,142 नवे रुग्ण सापडले. तर 180 COVID-19 रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यू दर 2.64 एवढा झाला आहे.
वाचा :- आता पंकजाताई मुंडेंनी शिवसेनेत यावे
एकूण घेतलेल्या 83,27,493 चाचण्यांपैकी 16,17,658 चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. म्हणजे हे प्रमाण 19.43 टक्के एवढं आहे. पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली घट कायम असून बुधवारी शहरातल्या Active रुग्णांची संख्या ही 8 हजारांवर आली आहे.