या कारणामुळे गांगुली आला अडचणीत!
गांगुलीने केलेल्या एका ट्विटमुळे चाहते संतापले
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसप्पवर’ लाईव्ह अपडेटस
22 Oct :- बीसीसीआय अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली त्याच्या एका ट्विटमुळे चांगलाच अडचणीत आला आहे. गांगुलीने केलेल्या एका ट्विटमुळे चाहते त्याच्यावर चांगलेच संतापले आहेत. चायनीज वस्तूची जाहिरात आपल्या ट्विटर अकाऊंडवरून शेयर केल्यामुळे गांगुलीला रोषाचा सामना करावा लागला आहे.
वाचा :- भारतात लवकरच लॉन्च होणार 5G नेटवर्क
लडाख सीमेवर भारत आणि चीन यांच्यात वाढलेल्या तणावानंतर आणि गलवान खोऱ्यात दोन्ही सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक झटापटीनंतर भारतात चीनविरोधात संतापाची लाट आहे. त्यामुळे भारतात चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरू लागली आहे. खेळाच्या मैदानातही भारताने चीनचा बहिष्कार केला आहे. आयपीएलचे प्रमुख प्रायोजक असणाऱ्या व्हिवोनेही त्यांचा करार मोडला. पण बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने चायनीज मोबाईलची जाहिरात केल्यानंतर त्याला ट्रोल करण्यात येत आहे.
वाचा :- ठाकरे सरकारने घेतला हा मोठा निर्णय
चायनीज ब्रॅण्डला प्रोत्साहन देताना लाज वाटली पाहिजे, गांगुलीकडून अशी अपेक्षा नव्हती, लवकर बरा हो, अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया सौरव गांगुलीच्या या ट्विटर अकाऊंटवर येत आहेत. सौरव गांगुलीने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन रेडमी या चायनीज मोबाईलची जाहिरात केली आहे.
वाचा :- ‘या’ ठिकाणी रुग्णवाढीमुळे ‘कर्फ्यू’ लागू होणार
2017 साली व्हिवोने पुढच्या 5 वर्षांसाठी बीसीसीआयशी आयपीएल प्रायोजक म्हणून 2,199 कोटी रुपयांचा करार केला होता. ही रक्कम 2012-17 च्या करारापेक्षा 454 टक्के जास्त होती. व्हिवोसोबतच्या करारामुळे बीसीसीआयला दरवर्षी 440 कोटी रुपये मिळायचे. यावर्षी व्हिवोने हा करार तोडल्यानंतर बीसीसीआयने ड्रीम-11 सोबत नवा करार केला.