भारत

भारतात लवकरच लॉन्च होणार 5G नेटवर्क

भारतात 5G नेटवर्कची केली यशस्वी चाचणी

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसप्पवर’ लाईव्ह अपडेटस

21 Oct :- भारतात लवकरच 5G नेटवर्क उपलब्ध होण्याची शक्यता आहे. रिलायन्स जिओनेयासाठी अमेरिकन टेक्नॉलॉजी फर्म क्वालकॉमबरोबर भारतात 5G नेटवर्कचे यशस्वी चाचणी केली आहे. अमेरिकेच्या सॅन डियागोमध्ये 20 ऑक्टोबर रोजी झालेल्या एका व्हर्च्यूअल इव्हेंटमध्ये दोन्ही कंपन्यांनी याची घोषणा केली. त्यामुळे भारतात लवकरच 5G नेटवर्क मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

वाचा :- लस दिल्यानंतर या कारणामुळे झाला 5 जणांचा मृत्यू

मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार, जिओ आणि क्वालकॉमने 5GNR सोल्यूशन्स आणि क्वालकॉम 5G RAN या प्लॅटफॉर्मवर 1 Gbps पर्यंतचा स्पीड मिळाल्याचं देखील म्हटलं आहे. सध्या जगभरात अमेरिका, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, जर्मनी आणि स्वित्झर्लंड मध्ये 5G नेटवर्क उपलब्ध असून या ठिकाणी ग्राहकांना इंटरनेटचा 1Gbps पर्यंत स्पीड मिळत आहे.

वाचा :- आता पंकजाताई मुंडेंनी शिवसेनेत यावे

रिलायन्स जिओचे प्रेसिडंट मॅथ्यू ओमान यांनी क्वालकॉमच्या इव्हेंटमध्ये माहिती देताना सांगितले, क्वालकॉम आणि रिलायन्सची सब्सिडियरी कंपनी रेडिसिससोबत आम्ही 5G नेटवर्कवर काम करत आहोत. त्यामुळे लवकरच भारतात देखील 5G नेटवर्क उपलब्ध होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. यामुळे ग्राहकांना इंटरनेटच्या 1Gbps स्पीडचा आनंद घेता येईल. भारतात ही टेक्नॉलॉजी आल्यानंतर ग्राहकांना 5G नेटवर्कचा अनुभव घेता येणार आहे.

वाचा :- मुख्यमंत्री माझे भाऊ- पंकजाताई मुंडे

क्वालकॉम ही जगातील वायरलेस क्षेत्रातील मोठी कंपनी आहे. त्यामुळे सध्या रिलायन्सबरोबर ती यासाठी काम करत आहे. यावर्षी जुलै महिन्यात क्वालकॉम कंपनीची गुंतवणूक करणारी कंपनी असणाऱ्या क्वालकॉम इंकने जिओमध्ये गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. त्यांनी जिओमधील 0.15 टक्के भागीदारी विकत घेण्यासाठी 730 कोटींची गुंतवणूक केली आहे.

वाचा :- म्हणून हिवाळयात कोरोनाचा संसर्ग वाढणार

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी या गुंतवणुकीविषयी असे म्हटले होते की, जिओ क्वालकॉम बरोबर 5G नेटवर्कवर काम करत असून लवकरच भारतात डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे. त्याचबरोबर कंपनी भारतातील 5G टेक्नॉलॉजी सोल्यूशनवर देखील काम करत असून याचा वापर रिटेल आणि इंड्रस्टीसाठी करण्यात येणार आहे.

वाचा :- तर 5 वर्ष फडणवीस मुख्यमंत्री राहीलेच नसते

वाचा :- अन्यथा ‘लक्ष्मी बॉम्ब’ प्रदर्शित होऊ देणार नाही