महाराष्ट्र

टाळ्या मिळाव्यात म्हणून मदतीची घोषणा करणार नाही- मुख्यमंत्री

थिल्लर चिल्लर आहेत, मला त्यांच्याकडे बघायला वेळ नाही

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसप्पवर’ लाईव्ह अपडेटस

21 Oct :- राज्यभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. आर्थिक संकटामध्ये सापडलेला शेतकरी खचल्या गेला आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष सवांद साधत आहेत. सवंग लोकप्रियतेसाठी किंवा टाळ्या मिळाव्यात म्हणून मदतीची घोषणा करणार नाही, असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उस्मानाबाद येथील पत्रकार परिषदेत केलं आहे.

वाचा :- आता पंकजाताई मुंडेंनी शिवसेनेत यावे

मुख्यमंत्री सध्या अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करत आहे. याचवेळी जे कोण थिल्लर चिल्लर आहेत, मला त्यांच्याकडे बघायला वेळ नाही असे म्हणत विरोधीपक्षनेत्यांनाही टोला लगावला आहे. मी पूर आणि अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांना भेटलो त्यांच्याशी संवादसाधला आहे. जी काही जास्तीत जास्त मदत करता येईल ती करणार आहोत. नुकसान मोठं आहे.

वाचा :- अखेर एकनाथ खडसेंनी दिला राजीनामा

मी इथे दौरा करतो आहे आणि तिकडे मंत्रालयात मदत कशी आणि कधी करायची त्यासंदर्भात कामही सुरु झाले आहे. पंचनामे जवळपास झाले आहेत. त्यामुळे नुसता विचार नाही पण प्रत्यक्ष मोबदला कसा द्यावा ते आम्ही पाहतो आहोत. दोन तीन दिवसांत यावर आपणास कळेल. विमा कंपन्यांशी देखील बोलून घेत आहोत.

वाचा :- मुख्यमंत्री माझे भाऊ- पंकजाताई मुंडे

केंद्राकडून जीएसटीची थकबाकी देखील येणे बाकी आहे, तो परतावाही लवकर मिळणे गरजेचे आहे. सवंग लोकप्रियतेसाठी, टाळ्या मिळाव्यात म्हणून मदतीची घोषणा करणार नाही, असेही ते म्हणाले.

वाचा :- तर 5 वर्ष फडणवीस मुख्यमंत्री राहीलेच नसते

वाचा :- अन्यथा ‘लक्ष्मी बॉम्ब’ प्रदर्शित होऊ देणार नाही