राजकारण

आता पंकजाताई मुंडेंनी शिवसेनेत यावे

खडसेंच्या राजीनाम्याने भाजपला उतरती कळा- खोतकर

21 Oct :- भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकत राजकीय भूकंप केला आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांवर त्यांनी शिक्कामोर्तब करत दोन ओळींमध्येच भाजपला राजीनामा दिला आहे. यानंतर आता सर्व नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांनी तर पंकजा मुंडेंनाच शिवसेनेत येण्याचे निमंत्रण दिले आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसप्पवर’ लाईव्ह अपडेट

एकनाथ खडसेंच्या राजीनाम्याने भाजपला उतरती कळा लागली आहे. नाथाभाऊंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या निर्णयानंतर पंकजा मुंडेंनी शिवसेनेत प्रवेश करावा असे मत शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर म्हणाले आहेत. अर्जुन खोतकर पुढे बोलताना म्हणाले की, ‘गेल्या 5 वर्षांमध्ये भाजपमध्ये जी काही भरती करण्यात आली होती. ती आता ओसरत आहे.

वाचा :- अखेर एकनाथ खडसेंनी दिला राजीनामा!

नाथाभाऊंसारखा ज्येष्ठ नेता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहे हा भाजपला मोठा धक्का आहे. भाजपचे आणखीही अनेक नेते नाराज असल्याच्या चर्चा आहेत. ते देखील येत्या काळात त्यांच्या बुद्धीप्रमाणे निर्णय घेतील असा दावा खोतकरांनी केला.

वाचा :- मुख्यमंत्री माझे भाऊ- पंकजाताई मुंडे

एकनाथ खडसे हे भाजप सोडून गेले यानंतर पंकजा मुंडे यांच्यावर भाजपात अन्याय होईल का? याविषयी खोतकर म्हणाले की, शिवसेनेची दारे सर्वांसाठी उघडी आहेत. पंकजा ताईच काय राज्यातला कुणीही नेता ज्याला सर्वसामान्यांसाठी, गोरगरिबांसाठी काम करायचे आहे, अशा नेत्यांना शिवसेनेची दारे उघडी आहेत. आम्ही त्यांचे स्वागत करु असे खोतकर म्हणाले.

वाचा :- तर 5 वर्ष फडणवीस मुख्यमंत्री राहीलेच नसते

वाचा :- अन्यथा ‘लक्ष्मी बॉम्ब’ प्रदर्शित होऊ देणार नाही