बीड

कु. प्राजक्ता येळेचे निट परिक्षेमध्ये गरुडभरारी!

प्राजक्ताच्या उत्तुंग यशाचे सर्व स्तरावर कौतुक!

21 Oct :- देशातील वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय परीक्षा संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहिर झाला. २०२० च्या नीट परीक्षेमधील परिक्षेमध्ये बीड जिल्ह्यामधील (टाकळवाडी ता. शिरुर कासार) कु. प्राजक्ता बबनराव येळे हिने ६२४ गुण घेऊन यशाची गरुडभरारी घेतली आहे. त्याबद्दल जिल्हयातुन तिचे भर-भरुन अभिनंदन केले जात आहे. प्राजक्ताच्या या नेत्रदीपक यशाबद्दल जन्म गावात ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसप्पवर’ लाईव्ह अपडेटस

सत्कारानंतर प्राजक्ताने मनोगत व्यक्त केले. प्राजक्ता म्हणाली, माझ्या या छोट्याश्या यशाबद्दल माझे खूप खूप अभिनंदन करणारे माझे आई बाब पूज्य गुरुजन वर्ग, आप्त स्वकीय, मित्र परिवार या सर्वाचे मी मनापासून आभार मानते. या सर्वाच्या प्रात्साहनातून आणि प्रेरणेतून मला गगणभरारी घेण्याची ताकद मिळाली. मी डॉक्टर होऊन गोर- गरीब जनतेची सेवा करीन ग्रामीण भागातील मुलीनी खूप खूप शिकावे, स्वत:वर विश्वास ठेवावा.

वाचा :- मुख्यमंत्री माझे भाऊ- पंकजाताई मुंडे

आईवडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेऊन प्रयत्न करावेत यश नक्कीच मिळते. यश मिळण्यासाठी न थांबता, न थकता न हरता प्रयत्न करावे लागतात. केवळ मुलगी म्हणून पालकांनी तीला घरी न ठेवता उच्च शिक्षण द्यायला पाहिजे. ग्रामीण भागातील मुली खूप हुशार व सक्षम आहेत. कृपया त्यांना घरी बसवू नका. मी खूप नशीबवान आहे, मला माझ्या पालकांनी खूप प्रोत्साहन दिले. प्रेरणा दिली, माझ्या उडणाऱ्या पंखात ताकद दिली त्या देवतुल्य आई. बाबांचे ऋण मी कधीच फेडू शकत नाही. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा, मला पुढील शिक्षणासाठी प्रेरणादायी ठरतील.

वाचा :- तर 5 वर्ष फडणवीस मुख्यमंत्री राहीलेच नसते

माझा गाव म्हणजे माझा परिवार आहे. या परिवाराच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी, त्याचबरोबर माझ्या जिल्ह्याची सेवा करण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहील.प्राजक्ताने संपादन केलेल्या या उत्तुंग यशाचे सर्व स्तरावर अभिनंदन केले जात आहे.

वाचा :- म्हणून हिवाळयात कोरोनाचा संसर्ग वाढणार

वाचा :- बीड कोरोना ब्रेकिंग! आज 87 रुग्ण पॉझिटिव्ह!!