सिनेमा,मनोरंजन

अन्यथा ‘लक्ष्मी बॉम्ब’ प्रदर्शित होऊ देणार नाही

हिंदू सेनेने दिला इशारा!

20 Oct :- कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे चित्रपटगृह बंद असले तरी सध्या अक्षय कुमारचा चाहता वर्ग लक्ष्मी बॉम्ब या चित्रपटाची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहता आहे. नुकताच लक्ष्मी बॉम्ब या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. लक्ष्मी बॉम्ब या चित्रपटाला देशभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसप्पवर’ लाईव्ह अपडेट

दाक्षिणात्य चित्रपट कांचना २ चा रिमेक असलेला लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट प्रदर्शित होण्या आगोदरच मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अभिनेता अक्षय कुमारचा लक्ष्मी बॉम्ब हा सिनेमा अडचणींमध्ये सापडण्याची चिन्हं आहेत. कारण हिंदू सेनेने लक्ष्मी बॉम्ब सिनेमातील कलाकार, दिग्दर्शक यांच्याविरोधात केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहून या सिनेमाला विरोध दर्शवला आहे.

वाचा :- मुख्यमंत्री माझे भाऊ- पंकजाताई मुंडे

या सिनेमातून देवीचा अपमान केला जातो आहे… तसंच लव्ह जिहादला या सिनेमात प्रोत्साहन देण्यात येते आहे. त्यामुळे आम्ही सांगितलेले बदल केले नाही तर हा सिनेमा संपूर्ण देशात प्रदर्शित होऊ देणार नाही असं हिंदू सेनेने म्हटलं आहे. हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहिलं आहे.

वाचा :- तर 5 वर्ष फडणवीस मुख्यमंत्री राहीलेच नसते

वाचा :- बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने केली कॅन्सरवर मात

वाचा :- म्हणून हिवाळयात कोरोनाचा संसर्ग वाढणार