अन्यथा दुर्गा अष्टमीच्या दिवशी ऊसतोड कामगार दुर्गेचा अवतार घेतील
पंकजाताई मुंडे यांनी दिला सरकारला इशारा
“राज्यात ऊसतोड कामगारांचे प्रश्न बिकट आहेत. त्यांचे प्रश्न दुर्गाअष्टमीपर्यंत सोडवा अन्यथा आंदोलन अटळ आहे.” असा इशारा माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी सरकारला दिला. त्या नांदेडमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतमालाच्या नुकसानीची पाहणी करत होत्या. नांदेडमध्ये नुकसान पाहणी दौऱ्यावर असताना त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच शेतातील नुकसानीची पाहणी केली. यावेळी बोलताना त्यांनी ऊसतोड कामगारांचे प्रश्न सोडवण्याची सरकारकडे मागणी केली.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसप्पवर’ लाईव्ह अपडेट
त्या म्हणाल्या, “राज्यातल्या ऊसतोड कामगारांचा प्रश्न सप्टेंबरमध्येच मिटला असता. पण कामगारांच्या प्रश्नांवर राजकारण चाललं. दुर्गा अष्टमीपर्यंत त्यांचे प्रश्न मिटले पाहिजेत, अन्यथा सरकारला ऊसतोड कामगारांच्या आंदोलनाला सामोरं जावं लागेल.”
वाचा :- मुख्यमंत्री माझे भाऊ- पंकजाताई मुंडे
यावेळी पंकजा मुंडे यांनी त्यांचे वडील गोपीनाथ मुंडे यांचा दाखला देत राज्य सरकारवर टीका केली. गोपीनाथ मुंडे यांच्या काळात उसतोड कामगारांचे आणि कारखानदार लवादाचे प्रश्न दोन बैठकीत मिटायचे. त्यांचीच परंपरा आम्हे चालू ठेवल्याचं त्या म्हणाल्या.
वाचा :- तर 5 वर्ष फडणवीस मुख्यमंत्री राहीलेच नसते
तसेच दसऱ्यापर्यंत ऊसतोड कामगारांचे प्रश्न सोडवा, अन्यथा दुर्गा अष्टमीच्या दिवशी ऊसतोड कामगार दुर्गेचा अवतार घेतील, असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी साखर कारखानदार, साखर संघ, आणि राज्यातील सरकारला दिला. दरम्यान,पंकजा मुंडे यांच्या इशाऱ्यानंतर राज्य सरकार काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.