मुख्यमंत्री माझे भाऊ- पंकजाताई मुंडे
पंकजाताईंना पाहताच शेतकऱ्यांना रडू कोसळलं
20 Oct :- शेतकऱ्यांचा दसरा तर अश्रूत गेला, आता राज्य सरकारने तातडीने मदत देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी, अशी मागणी माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केली. मुख्यमंत्री माझे भाऊ आहेत. पण भाऊ म्हणून नव्हे तर मुख्यमंत्री म्हणून मी शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी त्यांच्याकडे करणार असल्याचे मुंडे म्हणाल्या.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसप्पवर’ लाईव्ह अपडेट
आम्ही बहीण भाऊ आहोत, आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आमच्या नात्यामध्ये पक्ष आणि बाकी राजकारण येऊच शकत नाही. मुख्यमंत्री माझे भाऊ आहेत. पण भाऊ म्हणून नव्हे तर मुख्यमंत्री म्हणून मी शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी त्यांच्याकडे करणार असल्याचे मुंडे म्हणाल्या.
वाचा :- तर 5 वर्ष फडणवीस मुख्यमंत्री राहीलेच नसते
केंद्राकडून मदत मिळावी, यासाठी आम्ही पाठपुरावा करणार असल्याचे देखील पंकजा मुंडे म्हणाल्या. पंकजा मुंडे यांनी आज नांदेडमध्ये पीक नुकसानीची पाहणी केली. नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले. आता राज्य सरकारने उशीर करू नये. प्रत्येक पिकाबाबतचे ठोकताळे ठरवून शेतकऱ्यांना आताच मदत देणे गरजेचे असल्याचं मतही पंकजा मुंडेंनी व्यक्त केलं आहे. लोहा तालुक्यातील पारडी येथे एका वयोवृद्ध शेतकऱ्यानं पंकजा मुंडे यांना पाहताच हंबरडा फोडला.
वाचा :- लॉकडाऊन संपला आहे कोरोना नाही- पंतप्रधान
आमचं सगळं गेलं आम्ही कसं जगायचं, असा सवाल या शेतकऱ्यानं विचारला. पंकजा मुंडे यांनी देखील या शेतकऱ्याचं सांत्वन केलं. दुष्काळ पाहणी करण्यासाठी भाजपच्या केंद्रीय सचिव पंकजा मुंडे नांदेड दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी नांदेड आणि लोहा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी त्यांनी केली. बाजूच्या शेतात पाहणी करत असलेल्या पंकजा मुंडे यांना पाहून या शेतकऱ्याला रडू कोसळलं.
वाचा :- म्हणून हिवाळयात कोरोनाचा संसर्ग वाढणार
ताई इकडं या माझ्या शेतात बघा आम्ही कसं जगायचं. मूग गेला, सोयाबीन गेला, कापूस गेला आमचं सगळंच गेलं. आम्ही कसं जगायचं असा प्रश्न वयोवृद्ध शेतकरी पांडुरंग पवार यांनी विचारला. पंकजा मुंडे यांनी देखील या शेतकऱ्याला सावरण्याचा प्रयत्न केला. यावेळी गोपीनाथ मुंडे यांची आठवण देखील शेतकऱ्यांनी काढली.
वाचा :- बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने केली कॅन्सरवर मात