तर 5 वर्ष फडणवीस मुख्यमंत्री राहीलेच नसते
बच्चू कडूंचा फडणवीसांवर हल्लाबोल!
20 Oct :- राज्यात अतिवृष्टी झाल्यानंतर शेतकऱयांचे प्रचंड प्रमाणात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता विरोधव पक्षनेते देवेंद्र फडणवीस गेले होते तेंव्हा फडणवीस म्हणाला होते की मुख्यमंत्री ठाकरेंनी थिल्लरपणा लावला आहे, सरकार चालवायला दम लागतो आणि तो डाँ त्यांच्यात नाही. अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसप्पवर’ लाईव्ह अपडेट
त्यानंतर भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते. त्यावरून राज्यमंत्री बच्चू कडू यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, जेव्हा राज्यात फडणवीस यांचे सरकार होते तेव्हा त्यांना उद्धव ठाकरे यांचाच दम होता त्यामुळे त्यांना दम विचारण्याचा काहीच विषय नाही. उद्धव ठाकरेंचा दम त्यांना नसता तर ते पाच वर्ष मुख्यमंत्री राहिले नसते असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
वाचा :- लॉकडाऊन संपला आहे कोरोना नाही- पंतप्रधान
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. ते म्हणाले, ‘भाजपच्या 105 आमदारांना घरी बसवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात काय दम आहे तो त्यांनी दाखवून दिला आहे.
वाचा :- बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने केली कॅन्सरवर मात
कोरोना संकटासह नैसर्गिक संकटावर ज्याप्रकारे मुख्यमंत्र्यांनी मात केली, हे दम असल्याशिवाय शक्य नाही. सत्ता गेल्यानं देवेंद्र फडणवीस अस्वस्थ झालेत, त्यांनी संयम ठेवायला पाहिजे.’