भारत

लॉकडाऊन संपला आहे कोरोना नाही- पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना केले आवाहन

20 Oct :- भरात देशाचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज दि. २० ऑक्टो. रोजी संपूर्ण देशाला १२ मिनिटे संबोधित करत महत्वपूर्ण आवाहन केले आहे. संपूर्ण जगात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाचा भारतात शिरकाव झाल्यानंतर कडक लॉकडाऊन करण्यात आला. अनेक महिन्यांच्या निर्बंधांनंतर अनलॉक प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र अजूनही देशावरील कोरोनाचं संकट दूर झालेलं नाही. अशातच काही नागरिक बेफिकीर होत कोरोनाबाबतच्या खबरदारीकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करत महत्त्वाचं आवाहन केलं आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

‘लॉकडाऊन संपला असला तरीही कोरोना व्हायरस संपलेला नाही. अनेक लोकांनी कोरोना संपला आहे असं समजून काळजी घेणं सोडलं आहे किंवा कमी केलं आहे. परंतु जोपर्यंत लस येत नाही, तोपर्यंत काळजी घ्यावी लागणार,’ असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आज देशाचा कोरोना रिकव्हरी रेट चांगला आहे, मृत्यूचे प्रमाणही दिवसेंदिवस कमी होत आहे.

वाचा :- बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने केली कॅन्सरवर मात

जगातील प्रगत संपन्न देशांच्या तुलनेत भारत अधिकाधिक नागरिकांचे प्राण वाचविण्यात यशस्वी होत आहे. कोविड साथीच्या विरूद्ध लढा वाढवण्यासाठी चाचण्यांची वाढती संख्या ही आपली मोठी ताकद आहे. आपले डॉक्टर्स, परिचारिका, आरोग्य कर्मचारी देशातील मोठ्या लोकसंख्येची नि:स्वार्थ सेवा करत आहेत. त्यांच्या या सर्व प्रयत्नांमध्ये आपण निष्काळजीपणा न करणे ही आपली जबाबदारी आहे.

वाचा :- म्हणून हिवाळयात कोरोनाचा संसर्ग वाढणार

कोरोना निघून गेला आहे किंवा कोरोनाचा आता कोणताही धोका नाही, असं मानण्याची ही वेळ नाही. परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असताना अनेकजण कोरोनाचे नियम पाळता दिसत नाहीत. लोकांना खबरदारी घेणे बंद केलं हे चुकीचे आहे. तुम्ही मास्क लावत नसाल, हात वेळेच धुवत नसाल तर तुम्ही कुटुंबातील लहान मुले, वयस्कर व्यक्ती यांना संकटात टाकत आहात, असं मोदींनी सांगितलं.

वाचा :- नवनीत राणांनी मुख्यमंत्र्यांना दिला ‘हा’ कडक इशारा

कोरोनाची लस येईपर्यंत आपण कोरोनाशी असलेला आपला लढा कमकुवत होऊ देऊ नये. कोरोना लस येईल तेव्हा, ती प्रत्येक भारतीयापर्यंत किती लवकर पोहोचेल याची सरकारकडून तयारीही सुरू आहे. ही लस प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचली पाहिजे, त्यासाठी काम वेगाने सुरू आहे, असंही मोदींनी सांगितलं.

वाचा :- नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीनंतर ठाकरेंनी केली ‘ही’ घोषणा

वाचा :- बीड- वैद्यनाथ बँकेचे चेअरमन अशोक जैन यांना 10 लाखांची लाच घेताना पकडले