बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने केली कॅन्सरवर मात
जवळीक मित्र राज बंसल यांनी दिली माहिती
20 Oct :- ऑगस्ट महिन्यात एक बातमी आली आणि बॉलिवूड हादरलं. संजूबाबाला फुफ्फुसांचा कर्करोग झाल्याचं निदान झालं असून कॅन्सर अॅडव्हान्स स्टेजमध्ये पोहोचला असल्याचंही समजलं होतं. त्यानंतर अभिनेता संजय दत्त अनेकदा मुंबईतील लीलावती आणि कोकीलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात उपचारांसाठीही दाखल झाला होता. परंतु, सध्याच्या लेटेस्ट अपडेट्सनुसार, बॉलिवूड अभिनेता संजय दत्त म्हणजेच, सर्वांचा लाडका संजू बाबा कॅन्सरमुक्त झाला आहे.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
गेल्या चार दशकांपासून संजय दत्तचा जवळचा मित्र आणि फिल्म डिस्ट्रिब्यूशन क्षेत्रातील ओळखीचं नाव असेलेल राज बंसल यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे की, ‘अभिनेता संजय दत्तने कर्करोगावर मात केली असून आता तो पूर्णपणे बरा झाला आहे.’ राज बंसल यांनी सांगितले की, ‘संजय दत्त काल (सोमवारी) मुंबईतील कोकीलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात आपलं PET स्कॅन करण्यासाठी गेला होता.
वाचा :- बीड- वैद्यनाथ बँकेचे चेअरमन अशोक जैन यांना 10 लाखांची लाच घेताना पकडले
डॉक्टरांनी चेकअप केल्यानंतर सांगितलं की, संजय दत्त कॅन्सरमुक्त झाला आहे. PET स्कॅन टेस्ट जगभरात कॅन्सरच्या तपासणीसाठी ओळखली जाते.’ राज बंसल पुढे बोलताना म्हणाले की, ‘रुग्णालयात टेस्ट केल्यानंतर माझं संजयसोबत बोलणं झालं होतं. मला ही गोष्ट सांगताना संजय फार आनंदी असल्याचं दिसत होतं.
वाचा :- नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीनंतर ठाकरेंनी केली ‘ही’ घोषणा
‘डॉक्टरांच्या हवाल्याने स्वतः संजयने कॅन्सरमुक्त झाल्याचं सांगत खूप खूश असल्याचं सांगितलं. तसेच लवकरच आपल्या आगामी चित्रपटांचं अर्धवट राहिलेलं चित्रिकरण पूर्ण करणार असल्याचंही सांगितलं. त्याने सांगितलं की, पहिल्यांदा तो ‘केजीएफ’ची शूटिंग पूर्ण करणार आहे.