भारत

पंतप्रधान मोदीजी आज संध्याकाळी 6 वाजता देशाला संबोधणार

मोदीजी देशासाठी काय घोषणा करणार?

20 Oct :- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 6 वाजता राष्ट्राला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान मोदींनी मंगळवारी दुपारी ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. कोरोना व्हायरस संकटात पंतप्रधान मोदींनी याआधीही अनेकदा देशाला संबोधित केलं आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दुपारी ट्वीट केलं आहे की, ‘आज संध्याकाळी 6 वाजता देशासाठी एक संदेश देणार आहे. तुम्ही नक्की या.’ कोरोना संकट पाहता मोदी देशाला काळजी घेण्याचं आवाहन करू शकतात. तसेच देशात सण-समारंभांचं वातावरण असल्यामुळे निष्काळजीपण न करण्याचाही सल्ला देऊ शकतात. कोरोना संकटात एकूण सहा वेळा पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित केलं आहे. आज सातव्यांदा मोदी देशाला संबोधित करतील.

वाचा :- बीड- वैद्यनाथ बँकेचे चेअरमन अशोक जैन यांना 10 लाखांची लाच घेताना पकडले

वाचा :- ‘या’ महिन्यापर्यंत कोरोना येणार संपुष्टात!