आनंदाची बातमी! राज्यात आज ‘सर्वात कमी’ रुग्णवाढ
मृत्यूच्या संख्येतही घट!
19 Oct :- गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात प्रचंड स्वरूपात सुरु असलेला कोरोना विषाणूचा धुमाकूळ आता आता आटोक्यात येऊ लागला आहे. दिवसेंदिवस राज्यात वाढती रुग्णवाढ अचानक घटल्याने राज्यभरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.नागरिकांनी जर काटेकोरपणे नियमांचे पालन करत काळजी घेतली तर नक्कीच कोरोना संपुष्टात यायला वेळ लागणार नाही. तोंडाला मास्क आणि सोशल डिस्टन्सचा वापर काळजीपूर्वक केल्यास नक्कीच कोरोना विषाणूच्या संक्रमणास कायमचा ब्रेक लागेल.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
राज्यातला कोरोना रुग्णांचा चढता आलेख आता घसरणीला लागला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये या घसरणीत सातत्य असून त्यामुळे थोडा दिला मिळाला आहे. राज्यात सोमवारी (19 ऑक्टोबर) गेल्या कित्येक महिन्यात सर्वात कमी कोरोना रूग्णांची नोंद झाली. तसच मृत्यूच्या संख्येतही लक्षणिय घट झाल्याचं आढळून आलं आहे.
वाचा :- ठाकरेंचे सुपुत्र लीलावती रुग्णालयात दाखल!
दिवसभरात राज्यात 5 हजार 984 रुग्णांची नोंद झाली तर 125 जणांचा मृत्यू झाला. गेल्या काही महिन्यांपासून नव्या रुग्णांची संख्या ही 12 हजारांच्या वर राहात होती. तर मृत्यूचा आकडाही 300च्या जवळ स्थिर झाला होता. आज मागील तीन महिन्यात सर्वांत कमी मृत्यूची नोंद झाल्याचं आढळून आलं आहे.
वाचा :- बीड- वैद्यनाथ बँकेचे चेअरमन अशोक जैन यांना 10 लाखांची लाच घेताना पकडले
आज 15 हजार 69 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत, त्यामुळे राज्यात कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या ही 13 लाख 84 हजार 879 झाली आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 86.48 टक्के एवढे झाले आहे.
वाचा :- सुखद! ‘या’ महिन्यापर्यंत 40 हजार एवढीच रुग्णसंख्या राहील
राज्यात दिवसभरात 5 हजार 984 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ही 16 लाख 1 हजार 365 एवढी झालीय. तर आत्तापर्यंत एकूण 42,240 जणांचा मृत्यू झालाय.मुंबईत 24 तासांमध्ये 1234 नवे रुग्ण आढळले. तर 43 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईतल्या रुग्णांचा एकूण संख्या ही 2,43,169 एवढी झाली आहे. तर शहरात आत्तापर्यंत 9 हजार 819 जणांचा मृत्यू झाला आहे.
वाचा :- मोसमी पावसाचा मुक्काम लांबला; ‘या’ महिन्यात गारपिटीची शक्यता