भारत

सुखद! ‘या’ महिन्यापर्यंत 40 हजार एवढीच रुग्णसंख्या राहील

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे दिलासा देणारे विधान

19 Oct :- मार्च महिन्यापासून देशात धुमाकूळ घालत असलेल्या आणि सातत्याने वाढत असलेल्या कोरोनाच्या फैलावाने सर्वांना चिंतेत टाकले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून देशात नव्याने सापडणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी देशवासिंयांना दिलासा देणारे महत्त्वपूर्ण विधान केले आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

पुढील वर्षी फेब्रुवारी २०२१ पर्यंत देशातील कोरोनाच्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या घटून केवळ ४० हजार एवढीच राहील, असे हर्षवर्धन यांनी सांगितले. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने जगभरातील अनेक शास्त्रज्ञांच्या मदतीने भविष्यातील कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येचे आकलन करणारे मॉडेल तयार केले आहे.

वाचा :- बीड- वैद्यनाथ बँकेचे चेअरमन अशोक जैन यांना 10 लाखांची लाच घेताना पकडले

शास्त्रज्ञांनी तंत्रज्ञानाच्या आधारे केलेल्या संशोधनामधून जी माहिती समोर आली आहे. त्यानुसार पुढच्या तीन-ते चार महिन्यांमध्ये देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होणार आहे. तसेच फेब्रुवारी २०२१ मध्ये देशात कोरोनाचे केवळ ४० हजार अ‍ॅक्टिव्ह रुग्ण उरतील, असा दावा हर्षवर्धन यांनी केला.

वाचा :-  नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीनंतर ठाकरेंनी केली ‘ही’ घोषणा

कोरोनावरील लसीबाबत हर्षवर्धन म्हणाले की, कोरोनाविरोधातील लसीकरण, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि इतर महत्त्वपूर्ण गोष्टींबाबत राज्य सरकारसोबत योग्य वेळी चर्चा केली जाईल. देशात आता कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू द्यायची नाही आहे. तसेच आम्ही कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होतानाही बघत आहोत.

वाचा :-  नवनीत राणांनी मुख्यमंत्र्यांना दिला ‘हा’ कडक इशारा

यापूर्वी नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी थंडीच्या ऋतूमध्ये संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली होती. दरम्यान, सुरक्षेबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब केल्यास फेब्रुवारी २०२१ पर्यंत देशात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येईल, असे त्यांनी सांगितले होते.

वाचा :- मोसमी पावसाचा मुक्काम लांबला; ‘या’ महिन्यात गारपिटीची शक्यता

वाचा :- ‘या’ महिन्यापर्यंत कोरोना येणार संपुष्टात!