राजकारण

नवनीत राणांनी मुख्यमंत्र्यांना दिला ‘हा’ कडक इशारा

मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा

19 Oct :- राज्यभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेताला तळ्याचे स्वरूप आले आहे. पीक पाण्यावर तरंगल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे, तर शासनाने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असल्याचा आरोप अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केला आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

नवनीत राणा यांनी अमरावती जिल्ह्यातील नुकसान झालेल्या सोयाबीन व कपाशीच्या शेतात जाऊन पाहणी केली, त्यावेळी सरसकट सर्वेक्षण करून शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ नये म्हणून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी खासदार नवनीत राणांनी केली आहे. त्यांनी दर्यापूर भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष नुकसानाची पाहणी केली.

वाचा :- बीड- वैद्यनाथ बँकेचे चेअरमन अशोक जैन यांना 10 लाखांची लाच घेताना पकडले

मुख्यमंत्र्यांनी आता शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदतीचा हात द्यावा, कुठल्याच परिस्थितीमध्ये शेतकरी-शेतमजुरांची दिवाळी अंधारात जाणार नाही, यासाठी तातडीने उपाययोजना कराव्या अन्यथा खासदार म्हणून आपण रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, असा इशाराही खासदार नवनीत राणा यांनी दिला आहे. विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (19 ऑक्टोबर) ओल्या दुष्काळाने प्रभावित झालेल्या भागात भेट दिली. देवेंद्र फडणवीस हे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीसाठी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.

वाचा :- मोसमी पावसाचा मुक्काम लांबला; ‘या’ महिन्यात गारपिटीची शक्यता

वाचा :- नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीनंतर ठाकरेंनी केली ‘ही’ घोषणा