महाराष्ट्र

नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीनंतर ठाकरेंनी केली ‘ही’ घोषणा

जीवितहानी होऊ नये हे आमचं प्राधान्य आहे- ठाकरे

19 Oct :- यंदा राज्यभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतांना तळ्याचे स्वरूप आल्याने पिके पूर्णतःपाण्यावर तरंगली आहेत. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य सरकारकडून शेतकरी मदतीची मागणी करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापुरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली .तसंच शेतकऱ्यांशी आणि माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी घोषणा केली.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

मुख्यमंत्री म्हणाले “पंचनामे करुन सरकार मदत करणार आहे. त्यामुळे आज कोणतीही घोषणा करणार नाही,” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं. “परतीच्या पावसाचं संकट अजून टळलेलं नाही. येत्या काही दिवसात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे घाईगडबडीने कोणताही निर्णय घेणार नाही,” असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

वाचा :- बीड- वैद्यनाथ बँकेचे चेअरमन अशोक जैन यांना 10 लाखांची लाच घेताना पकडले

मुख्यमंत्र्यांनी सोलापुरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली तसंच शेतकऱ्यांशी बातचीत केली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही घोषणा केली. “पुढील दोन दिवस नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहे. जीवितहानी होऊ नये हे आमचं प्राधान्य आहे. यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहे. पूरग्रस्त भागातील अधिकाऱ्यांच्या सातत्याने संपर्कात आहोत.

वाचा :- मोसमी पावसाचा मुक्काम लांबला; ‘या’ महिन्यात गारपिटीची शक्यता

नुकसानग्रस्तांना दिलासा आणि धीर देण्यासाठी मी आलो आहे. संकट पूर्णपणे टळलेलं नाही. पंचनामे सुरु आहे. पूर्ण परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर प्रत्यक्ष मदत केली जाईल. कोणीही काळजी करण्याचं आणि घाबरण्याचं कारण नाही. पुढील काही दिवस अतिवृष्टीचा इशारा देता आहे. त्यामुळे सावध राहा, प्राणहानी होऊ देऊ नका,” असं मुख्यमंत्री म्हणाले. केंद्राकडून मदत मिळेल, असं आश्वासन खुद्द पंतप्रधानांनी फोनवरुन दिलं आहे,” असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

वाचा :- ‘या’ महिन्यापर्यंत कोरोना येणार संपुष्टात!

वाचा :-  सरकार चालवयाला दम लागतो- फडणवीस