सचिन तेंडुलकरच्या जवळीक मित्राचा कोरोनामुळे झाला मृत्यू
सचिन तेंडुलकर झाला भावुक!
19 Oct :- देशभरात कोरोना विषाणूने सर्व सामन्यांसह अनेक मोठं मोठ्या सेलिब्रेटीसचा बाली घेतला आहे. कोटोन विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मानवी आयुष्य पूर्णतः विस्कळीत झाले आहे. देशभरात सर्वत्र कोरोना विषाणूचा शिरकाव झाला आहे. आताच प्राप्त झालेल्या माहितीनुसार भारताचा दिग्गज माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचे जवळचे मित्र अवि कदम यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. याबाबत स्वत: सचिन तेंडुलकरने ट्वीट करत माहिती दिली आहे.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
कोरोनाची लागण झालेल्या गेल्या काही दिवसांपासून अवि कदम यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्वत: सचिनने डॉक्टरांना फोन करून त्यांच्या स्थितीबाबत माहिती घेतली होती. मात्र दुर्दैवाने अवि कदम यांचा मृत्यूसोबतचा संघर्ष अयशस्वी झाला.
बीड- वैद्यनाथ बँकेचे चेअरमन अशोक जैन यांना 10 लाखांची लाच घेताना पकडले
सचिनने भावुक होत अवि कदम यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींना उजाळादेखील दिला आहे. ‘माझा प्रिय मित्र अवि कदम याचं निधन झालं आहे. शाळेतल्या दिवसांपासून तो माझा जवळचा मित्र होता. क्रिकेटच्या सरावानंतर शिवाजी पार्काबाहेर आमच्यात होणारी भेट माझ्या कायम स्मरणात राहील. त्याच्या नातेवाईंसोबत माझ्या सहवेदना आहेत,’ असं ट्वीट करत सचिन तेंडुलकर याने मित्राच्या आठवणी सांगितल्या आहेत.
वाचा :- मोसमी पावसाचा मुक्काम लांबला; ‘या’ महिन्यात गारपिटीची शक्यता