देश विदेश

चीनमध्ये लस विक्री सुरु; ‘ही’ आहे लसीची किंमत

सर्वाधिक धोका असलेल्या व्यक्तींसाठी लस विक्री सुरू करण्यात

18 Oct :- जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना सगळेच त्यावरील लसीची वाट पाहत आहेत. ज्या देशातून कोरोना विषाणूच्या संसर्गाला सुरूवात झाली त्या चीनमध्येही कोरोनाच्या लसीवर चाचण्या सुरू आहेत. दरम्यान, पूर्व चीनमधील एका शहरात चाचणीशिवाय प्रयोग म्हणून कोरोनाची बाधा होण्याचा सर्वाधिक धोका असलेल्या व्यक्तींसाठी लस विक्री सुरू करण्यात आली असून आपात्कालीन लशीकरण मोहिम सुरू राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत साधारण ६ हजार ४०० रुपये किंमतीची लस उपलब्ध करून दिली जात आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

बीजिंगमधील सिनोवॅक बायोटेक कंपनीच्यावतीने ही लस विकसित करण्यात आली असून या लशीची चाचणी अंतिम टप्प्यात आली आहे. सिनोवॅकची CoronaVac ही लस पूर्व चीन भागातील झेजियांग प्रातांतील जियाशिंग राज्यातील आरोग्य कर्मचारी, महासाथीचा आजार रोखण्यासाठी कार्यरत असणाऱ्या कर्मचारी-अधिकारी, लोकसेवेत कार्यरत असलेल्या स्वयंसेवकांना ही लस खरेदी करता येणार आहे.

वाचा :- आता कोरोनाला रोखन सहज शक्य होणार

चीनच्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या लशीच्या प्रयोगानंतर सर्वसामान्य जनतेला लस उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासंबंधी जियाशिंग सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अॅण्ड प्रीव्हेशनने (सीडीसी) म्हटले की, चिनी कंपनी सिनोवॅक बायोटेक लिमिटेडच्यावतीने विकसित करण्यात आलेली लस १८ ते ५९ या वयोगटातील मंडळींना लस उपलब्ध होणार आहे.

वाचा :- मोसमी पावसाचा मुक्काम लांबला; ‘या’ महिन्यात गारपिटीची शक्यता

वाचा :- राजीनाम्या बाबत एकनाथ खडसेंनी केला मोठा खुलासा