आता कोरोनाला रोखन सहज शक्य होणार
संशोधकांनी विकसित केले नवे तंत्र!
18 Oct :- अमेरिकेतील वैज्ञानिकांनी एक नवीन तंत्र विकसित केली आहे. याचा वापर करून कोरोना व्हायरसचा प्रसार होण्यापासून रोखता येऊ शकतं. या नवीन तंत्रामुळे कोरोनाचा प्रसार करणारं खास प्रोटीन ब्लॉक होतं. कोरोनाने शरीरात प्रवेश केल्यानंतर प्रोटीन इम्यून सिस्टीमचे महत्वपूर्ण भाग खराब होतात. या नवीन तंत्राने कोरोनाच्या पेशींना वाढण्यापासून रोखता येऊ शकतं.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी औषध तयार करण्यासाठी हे संशोधन परिणामकारक ठरेल. हे संशोधन जर्नल साइंसमध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे. वैज्ञानिकांनी या प्रक्रियेसाठी दोन अणूंचा विकास केला होता. जे कोरोना व्हायरसद्वारे वापरल्या जात असलेल्या सीजर एंजाइम्सना रोखतात. याला SARS-CoV-2-PLpro म्हणतात. SARS-CoV-2-PLpro व्हायरल आणि ह्यूमन प्रोटीन्स दोन्हींना वाढण्यासाठी कारणीभूत ठरतात.
वाचा :- मोसमी पावसाचा मुक्काम लांबला; ‘या’ महिन्यात गारपिटीची शक्यता
हेल्थ सायंस सेंटरमध्ये बायोकेमेस्ट्री आणि स्ट्रक्चरल बायोलॉजीचे साहाय्यक प्राध्यापक ऑल्सन यांनी सांगितले की, हे एंजाइम्स प्रोटीन्स रिलिजना प्रोत्साहीत करतात. त्यामुळे व्हायरस रेप्लिकेट करण्याास मदत मिळते.प्रोफेसर ऑल्सन यांनी सांगितले की, हा एंजाइम सायटोकाइंस आणि किमोकाइंससारख्या अणूंना बाधित करतो. जे इम्यून सिस्टीमला इंफेक्शन करण्याचे संकेत देतात. ‘SARS-CoV-2-PLpro साधारणपणे यूबिक्टिन आणि ISG15 ह्यूमन प्रोटीन्सची चेन कापून टाकतात.
वाचा :- कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यानी दिला ‘हा’ सल्ला
संशोधकांनी असे तंत्र विकसित केले आहे. ज्याद्वारे SARS-CoV-2-PLpro ला वाढण्यापासून रोखता येऊ शकतो. यामुळे मानवी प्रोटीन्सशी मिळत्या जुळत्या असलेल्या प्रोटीन्सची ओळख होते. फक्त व्हायरल एंजाईम्स नाही तर समान कार्य असलेल्या ह्यूमन एंजाईमला रोकता येऊ शकतं. दरम्यान कोरोनामुळे आतापर्यंत ४ कोटींपेक्षा जास्त लोक संक्रमित झाले असून या जीवघेण्या व्हायरसच्या संपर्कात आल्यामुळे आतापर्यंत १० लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा सगळ्यात जास्त प्रभाव भारत, अमेरिकेवर
वाचा :- ‘या’ महिन्यापर्यंत कोरोना येणार संपुष्टात!
वाचा :- कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यानी दिला ‘हा’ सल्ला