बीड

विघ्नहर्ता स्वस्त औषधी दुकानाचा वर्धापन दिन

रक्तदाब व मधुमेह शिबिरात 250 रूग्णांची तपासणी

बीड दि.18 Oct :- विघ्नहर्ता स्वस्त औषधी सेवा या बीड शहरातील नगरनाका नाट्यगृह रोडवर सुरू असलेल्या दुकानाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने शनिवार दिनांक 17 ऑक्टोबर 2020 रोजी मोफत रक्तदाब आणि शुगर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिराचा शुभारंभ जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती होती.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

प्रारंभी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात, पत्रकार भागवत तावरे आदी उपस्थितांचे विघ्नहर्ता स्वस्त औषधी दुकानाच्या वतीने नारायण नागरे आणि मनोज नारायण नागरे यांनी स्वागत केले. वर्धापनदिनाच्या निमित्ताने सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी विक्रम पोकळे, उपप्राचार्य लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर, उपशिक्षणाधिकारी भगवान सोनवणे, हिरालाल कराड, गटशिक्षणाधिकारी गौतम चोपडे, शिक्षण विस्तार अधिकारी तुकाराम पवार, प्रा.पी.आर. गंडाळ, अ‍ॅड.जयंत राख, प्रा.शिवराज बांगर, डॉ.सुधाकर आंधळे, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष वैभव स्वामी, पत्रकार शेख मज्जीद, विलास डोळसे, अनिल अष्टपुत्रे, गणेश जाधव, प्रविण घाडगे, शुभम खाडे, संजय सानप, केकान सर, जीवनराव सानप, प्रा.लक्ष्मण गुंजाळ, एस.टी.गायकवाड, आदीसह विविध मान्यवरांनी भेटी देवून शुभेच्छा दिल्या.

वाचा :- ‘या’ महिन्यापर्यंत कोरोना येणार संपुष्टात!

शनिवारी दिवसभर विविध मान्यवर व सुमारे 250 रूग्णांनी तपासणी शिबिरात रक्तदाब व मधुमेह तपासरी करून घेतली. केंद्र शासनाच्या जन औषधी योजनेवर आधारीत सदर स्वस्त औषधी सेवा सुरू करण्यात आलेली आहे. विविध आजारावर असलेल्या औषधी या 30 ते 70 टक्के स्वस्त आहेत. स्वस्त औषधी सुविधेचा दैनंदिन असंख्य रुग्ण लाभ घेत आहेत.

वाचा :- कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यानी दिला ‘हा’ सल्ला

वाचा :- वेळ आल्यास घटना बदलण्यासाठीही माझा अभ्यास सुरु- संभाजीराजे