राजीनाम्या बाबत एकनाथ खडसेंनी केला मोठा खुलासा
खडसेंनी आपली भूमिका स्पष्ट केली
18 Oct :- नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी रविवारी पक्षाचा राजीनामा दिल्याच्या वृत्ताने राज्यात खळबळ उडाली होती. खडसे हे लवकरत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं त्यांच्या समर्थकांनी या आधीच सांगितलं होतं. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. यावर आता खुद्द एकनाथ खडसे यांनी खुलासा केला आहे.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
आपण भाजपचा राजीनामा दिलेला नाही असं त्यांनी सांगितलं. खडसे यांनी राजीनामा दिला असल्याचं वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिलं होतं. मात्र खडसे यांच्याकडून अधिकृतपणे त्याबाबत सांगितलं जात नव्हते. मात्र सायंकाळी खडसे यांनी खुलासा करत आपली भूमिका स्पष्ट केली. तर एकनाथ खडसे यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे भाजप सदस्यत्त्वाचा राजीनामा पाठवला असून ते येत्या गुरुवारी 22 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती ‘सरकारनामा’ने प्रसिद्ध केली होती.
वाचा :- ‘या’ कारणामुळे आघाडीच्या सर्व खासदारांना घेवून शरद पवार मोदींना भेटणार
या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले, नाथाभाऊंनी पक्षाचा राजीनामा दिला नाही. नाथाभाऊ पक्षाचा राजीनामा देणार नाहीत. असं करुन ते स्वत: चं नुकसान करुन घेणार नाहीत, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. दरम्यान, भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनीही एकनाथ खडसे यांच्या भाजप सोडण्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘चर्चाही केवळ चर्चा असते. त्याचा काहीही अर्थ नसतो. एकनाथ खडसे हे भाजप सोडून जाणार नाहीत याची मला खात्री आहे. खडसे हे अनुभवी आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत’ असं पंकजा मुंडे यांनी सांगितले.
वाचा :- ‘या’ महिन्यापर्यंत कोरोना येणार संपुष्टात!
वाचा :- कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यानी दिला ‘हा’ सल्ला