Popular News

‘या’ महिन्यापर्यंत कोरोना येणार संपुष्टात!

सरकारने नेमलेल्या वैज्ञानिकांची समितीचा दावा!

18 Oct :- देशभरात सुरु असलेले कोरोना विषाणूचे महाकाय थैमान आता काही प्रमाणात शमल्या चालले आहे. देशात रुग्णवाढ कायम होत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिलासा देणारे आहे. मृत्युदर सुद्धा घटू लागला आहे. देशात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनलॉकचे सत्र सुरु आहे. कोरोना संसर्गाची दक्षता घेत पूर्ववत सगळं काही सुरु होत आहे. त्यामुळे लोक आता घरबाहेर पडू लागली आहेत. यामुळे गर्दी सुद्धा होत आहे. वाढत्या गर्दीमुळे कोरोना विषाणूचा पसरावं वेगाने होत आहे.मात्र रुग्णवाढ आटोक्यात आल्याने कोरोनाचे मोठे संकट लवकरच संपुष्टात येण्याचे संकेत मिळत आहेत.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

सरकारने नेमलेल्या वैज्ञानिकांची समितीचा दावा आहे की, कोरोना महामारी फेब्रुवारी 2021 पर्यंत संपुष्टात येण्याची शक्यता आहे. त्यांच्या मते, भारतात कोरोनाबाधितांचा संख्या एक कोटी सहा लाखांपेक्षा जास्त होणार नाह. सध्या भारतात कोरोनाबाधितांची संख्या 75 लाखांहून अधिक आहे. एका इंग्रजी वृत्तापत्राला दिलेल्या माहिती या समितीने म्हटलं की, कोरोना व्हायरस रोखण्यासाठी घेत असलेल्या उपाययोजना सुरू ठेवल्या पाहिजेत.

वाचा :- वेळ आल्यास घटना बदलण्यासाठीही माझा अभ्यास सुरु- संभाजीराजे

सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार के. विजयराघवन यांनी या समितीची स्थापना केली आहे. आयआयटी हैदराबादचे प्रमुख विद्यासागर हे या समितीचे प्रमुख आहेत. समितीच्या मते, जर मार्चमध्ये भारताने लॉकडाऊन लागू केले नसते तर देशभरात 25 लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असता. आतापर्यंत या साथीच्या आजारामुळे 1 लाख 14 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

वाचा :- ‘या’ महिन्यापसायन भारतात क्रिकेटला होणार प्रारंभ- BCCI

निती आयोगाचे सदस्य आणि कोविड तज्ज्ञ पॅनेलचे प्रमुख डॉ. व्ही के पॉल यांनी सांगितले की, गेल्या तीन आठवड्यांत नवीन कोरोनाबाधित रुग्ण आणि कोरोनामुळे मृत्यूंचं घटलं आहे. मात्र हिवाळ्यात भारतात कोरोना व्हायरसची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनाची लस एकदा आली की ती नागरिकांना उपलब्ध करुन देण्यासाठी पुरेशी संसाधने उपलब्ध आहेत. भारत आता चांगल्या स्थितीत आला आहे, परंतु अजून लांबचा पल्ला गाठायचा आहे. कारण 90 टक्के लोकांना आताही कोरोनाची लागण सहज होऊ शकते.

वाचा :- ‘या’ भारतीय वेगवान गोलंदाजास कोरोनाची लागण; IPL मधून बाहेर

वाचा :- गॅस सिलेंडर घरपोहच मिळणार नाही; जाणून घ्या नवे निअम व अटी!