बीड

बीड कोरोना ब्रेकिंग! आज 79 नवे रुग्ण पॉझिटिव्ह!!

रुग्णवाढ आली आटोक्यात!

18 Oct :- बीड जिल्यात रोज सुरु असलेल्या कोरोना विषाणूच्या शतकीय खेळीला आज ब्रेक लागला आहे. आज जिल्ह्यात रुग्णवाढ समाधानकारक आटोक्यात आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रशासन प्रयत्न करत आहे मात्र कोरोनाचा वेग कमी होतांना दिसत नाही. राज्यात सध्या अनलॉकची प्रक्रियाही सुरू आहे. लोकांनी नियमांचं पालन केलं नाही आणि अशीच गर्दी वाढत राहिले तर कोरोनाची दुसरी लाट येवू शकते अशी शक्यता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलीय.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

लोक आता कामानिमित्त घराबाहेर पडत आहेत. गर्दी वाढत आहे आणि नियमांचं पालन ज्या काटेकोरपणे करायला पाहिजे त्या पद्धतीने होत नाही त्यामुळे कोरोनाचा वेग वाढण्याची भीती आहे. लोकांना कठोरपणे नियमांचं पालन करावं असं आवाहनही प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक शहरामध्ये,गावामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे.बीड जिल्ह्यात रोज कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी मोठी डोकेदुखी ठरली आहे.

वाचा :- वेळ आल्यास घटना बदलण्यासाठीही माझा अभ्यास सुरु- संभाजीराजे

कोरोना विषाणूच्या वाढत्या पसरावा मुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊ लागले आहे.एकंदरीत कोरोना विषाणूच्या संक्रमना पासून स्वतः खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

वाचा :- ‘या’ महिन्यापसायन भारतात क्रिकेटला होणार प्रारंभ- BCCI

माझी कुटुंब माझी जबाबदारी या योजने प्रमाणे प्रत्येकाने कोरोनाशी दोन हात करणे गरजेचे आहे. आताच आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज रुग्णवाढीत मोठी भर पडली आहे.आज बीड जिल्ह्यात 79 नवे रुग्ण आढळले आहेत.

वाचा :- ‘या’ भारतीय वेगवान गोलंदाजास कोरोनाची लागण; IPL मधून बाहेर

वाचा :- गॅस सिलेंडर घरपोहच मिळणार नाही; जाणून घ्या नवे निअम व अटी!