क्रीडा

‘या’ महिन्यापसायन भारतात क्रिकेटला होणार प्रारंभ- BCCI

सौरव गांगुलीने केली घोषणा!

18 Oct :- बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने भारतात क्रिकेट सुरू करण्याबाबत मोठी घोषणा केली आहे. रणजी ट्रॉफीचा मोसम एक जानेवारीपासून सुरू होईल, असं गांगुलीने सांगितलं आहे. बीसीसीआयच्या बैठकीमध्ये भारतातल्या स्थानिक क्रिकेटबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कोरोना व्हायरसमुळे यंदाचा रणजी मोसम अजूनही सुरू झालेला नाही. यावर सौरव गांगुलीला विचारण्यात आलं. बराच वेळ आम्ही यावर चर्चा केली असून जानेवारी 2021 पासून स्थानिक स्पर्धा सुरू होतील, असं गांगुली म्हणाला.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

यावेळचा क्रिकेटचा सिझन छोटा असेल का? हा प्रश्नही गांगुलीला विचारण्यात आला. या परिस्थितीमध्ये सगळ्या स्थानिक स्पर्धांचं आयोजन करणं शक्य नाही, असं गांगुलीने सांगितलं. बीसीसीआय रणजी ट्रॉफीसाठी जानेवारी ते मार्च या कालावधीचा विचार करत आहे. रणजी ट्रॉफीचा पूर्ण मोसम होईल, पण इतर स्पर्धा खेळवणं कदाचित शक्य होणार नाही, अशी प्रतिक्रिया गांगुलीने दिली. प्रवास कमी करण्यासाठी रणजी ट्रॉफीच्या मॅचना चार वेगवेगळ्या केंद्रांवर खेळवलं जाण्याची शक्यता आहे.

वाचा :- वेळ आल्यास घटना बदलण्यासाठीही माझा अभ्यास सुरु- संभाजीराजे

याबाबत माहिती देताना बीसीसीआय अधिकारी म्हणाले, ‘पुदुच्चेरीमध्ये सहा मैदान आहेत. त्यांनी रणजी ट्रॉफीच्या मॅच खेळवण्यात रस दाखवला आहे. इकडे प्लेट ग्रुपच्या मॅच खेळवल्या जाऊ शकतात. तर अन्य ग्रुप तीन वेगळ्या केंद्रावर खेळतील. बँगलोरकडेही बरीच मैदान आहेत, त्यामुळे तो एक पर्याय आहे. तसंच धर्मशालाही आहे कारण तिकडून बिलासपूर आणि नादौन जवळ आहे.’ गांगुलीच्या या वक्तव्यामुळे राज्य संघांना मोसमाची तयारी करण्यासाठीच्या गोष्टी स्पष्ट झाल्या.

वाचा :- ठाकरे सरकारने केली मोठी घोषणा; दसऱ्यापासून ‘हे’ सुरु होणार

कोरोना व्हायरसचा फटका संपूर्ण देशाला पडला आहे. बहुतेक खेळाडू स्वत:च ट्रेनिंग करत आहेत. या आठवड्यात उत्तराखंड एकाच छताखाली ट्रेनिंग सुरू करणारी पहिली टीम बनली आहे. तसंच ज्युनियर क्रिकेट आणि महिला स्पर्धांचं आयोजन मार्च-एप्रिल महिन्यापासून होईल, असं गांगुलीने सांगितलं. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आम्हाला एक कार्यक्रम पाठवला आहे, यावर आम्ही चर्चा केली. आम्ही 4 टेस्ट खेळणरा असून, त्या जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात संपणार आहेत, असं वक्तव्य गांगुलीने केलं. भारतीय टीम ऑस्ट्रेलियात 3 वनडे, 3 टी-20 आणि 4 टेस्ट मॅच खेळण्याची शक्यता आहे.

वाचा :- ‘या’ भारतीय वेगवान गोलंदाजास कोरोनाची लागण; IPL मधून बाहेर

वाचा :- गॅस सिलेंडर घरपोहच मिळणार नाही; जाणून घ्या नवे निअम व अटी!