महाराष्ट्र

महाराष्ट्राचे आजचे कोरोना अपडेट!

राज्याचा रिकव्हरी रेट वाढला

17 Oct :- राज्यात कोरोना विषाणूचा कहर गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे. आज मात्र सर्वांच्या मनाला दिलासा देणारी माहिती समोर आली आहे.कोरोना विषाणूच्या भरधाव गाडीचा गेर टॉपवरच आहे.कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत भरमसाठ वाढ होताना दिसू येत आहे.मात्र आज रुग्ण बरे होण्याचे प्रमाण समाधानकारक आहे. तरी आजही रुग्णवाढ मात्र चिंताजनकच आहे. सध्य परिस्थितीमधील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणखी एक कोरोना लाट येती की काय असा प्रश्न नागरिकांना भेडसावू लागला आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ उतार होत आहेत. मात्र मृत्यूची संख्या कमी होत नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. राज्यात दररोज कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून आज 14 हजार 238 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.65 टक्के एवढे झाले आहे. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या साडे तेरा लाखांवर गेली असून राज्यातील उपचार सुरू असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या देखील कमी होऊन 1 लाख 85 हजार 270 एवढी कमी झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

वाचा :- शेतकऱ्यांना आताच आर्थिक मदत जाहीर करता येणार

आजपर्यंत करण्यात आलेल्या 80 लाख 69 हजार 100 नमुन्यांपैकी 15 लाख 86 हजार 321 नमुने पॉझिटिव्ह (19.66 टक्के) आले आहेत. राज्यात 23 लाख 95 हजार 552 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 23 हजार 749 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

वाचा :- ठाकरे सरकारने केली मोठी घोषणा; दसऱ्यापासून ‘हे’ सुरु होणार

राज्यात आज 250 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.शुक्रवारी दिवसभरात 13 हजार 885 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. त्यामुळे राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांची एकूण संख्या ही 13 लाख 44 हजार 368 एवढी झाली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 85.3 टक्के एवढे झाले. आज राज्यात दिवसभरात 11 हजार 447 नव्या रुग्णांचं निदान झालं. तर 306 जणांचा मृत्यू झालं. मृत्यूचं प्रमाण 2.63 एवढं झालं आहे.

वाचा :- ‘या’ कारणामुळे कंगनावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल!

वाचा :- गॅस सिलेंडर घरपोहच मिळणार नाही; जाणून घ्या नवे निअम व अटी!