राजकारण

शेतकऱ्यांना आताच आर्थिक मदत जाहीर करता येणार

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे स्पष्टीकरण

17 Oct :- कोरोनाचे संकट असतानाच पुन्हा राज्यावर पुराचे आणि अतिवृष्ठीचे अस्मानी संकट ओढवले आहे. यामुळे राज्य सरकारची देखील आर्थिक कोंडी झाली आहे. गेल्या सहा महिन्यापासून कर्ज काढून राज्याचा कारभार चालवला जातोय, असे सांगत अतिवृष्ठी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आताच आर्थिक मदत जाहीर करता येणार नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे स्पष्ट केले.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

अतिवृष्टी आणि महापुरामुळे पंढरपूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे पंढरपूर शहरातील कुंभार घाटाजवळ सहा जणांचा मृत्यु झाला आहे. याची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार आज पंढरपुरात आले होते.पाहणी नंतर श्री. पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यापुढे अनेक आर्थिक अडचणी असून केंद्र सरकारने जीएसटीचे 60 हजार कोटी रुपये तातडीने द्यावेत, अशी मागणीही पवार यांनी केली.

वाचा :- ठाकरे सरकारने केली मोठी घोषणा; दसऱ्यापासून ‘हे’ सुरु होणार

यावेळी आमदार भारत भालके, प्रांताधिकारी सचिन ढोले, जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वीनी सातपुते, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत कदम, राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष मारुती जाधव, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष संदीप मांडवे, श्रीकांत शिंदे उपस्थित होते. पंढरपुरात येण्यापूर्वी श्री. पवार यांनी तालुक्‍यातील पटवर्धन कुरोली, भोसे या ठिकणाच्या नुकसान झालेल्या पिकांची आणि रस्त्यांची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला.

वाचा :- शाळा सुरु करण्याबाबत उपमुख्यमंत्र्यांनी केले ‘हे’ विधान

जलयुक्त शिवारच्या कामाबाबत कॅगने ताशेरे ओढले आहेत. कॅग ही केंद्र सरकारची एजन्सी आहे. या कामाची चौकशी करण्यामागे कोणताही राजकीय आकस नाही. सिंचन घोटाळ्याचा विषय न्याय प्रविष्ट आहे. गेल्या सहा वर्षापासून याची चौकशी सुरु आहे, असे सांगत श्री. पवार यांनी ईडीच्या नोटीसीबाबत बोलण्यास नकार दिला.

वाचा :- ‘या’ कारणामुळे कंगनावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल!

पंढरपूरात जवळपास एक हजार कोटींची विकासकामे झाली आहेत. मात्र ती अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली आहेत. सध्या सुरु असलेल्या घाटाचे काम देखील निकृष्ठ दर्जाचे झाले आहे. याबाबत पुणे येथे दोन तीन दिवसात आढावा बैठक घेवून माहिती घेणार असल्याने त्यांनी सांगितले.

वाचा :- ‘या’ भारतीय वेगवान गोलंदाजास कोरोनाची लागण; IPL मधून बाहेर

वाचा :- गॅस सिलेंडर घरपोहच मिळणार नाही; जाणून घ्या नवे निअम व अटी!