राजकारण

मुख्यमंत्री पडणार घराबाहेर; शेतकऱ्यांशी साधणार संवाद

मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील भागांचा करणार दौरा

17 Oct :- सतत विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घराबाहेर पडत नसल्याची टीका होत होती. अशा परिस्थितीमध्ये आताच प्राप्त झालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधणार संवाद साधण्यासाठी आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह राज्यातील काही नेते शेतकऱ्यांच्या बांधावर असताना मुख्यमंत्र्यांना घर सुटेना! अशी खोचक टीका भाजपकडून होत आहे. या टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कृतीतून उत्तर दिलं आहे. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या सोमवारी (19 ऑक्टोबर) मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांचा दौरा करणार आहेत.

वाचा :- ठाकरे सरकारने केली मोठी घोषणा; दसऱ्यापासून ‘हे’ सुरु होणार

नुकसानीची पाहाणी झाल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत जाहीर करण्याची शक्यता आहे. यावेळी त्यांच्यासोबतमुख्यमंत्री 19 ऑक्टोबरला राज्यातील पूरग्रस्त भागातील नुकसानीची पाहाणी करणार आहेत. सकाळी 8 वाजता मुख्यमंत्री सांताक्रुझ विमानतळ येथून सोलापूरकडे प्रयाण करतील.

वाचा :- शाळा सुरु करण्याबाबत उपमुख्यमंत्र्यांनी केले ‘हे’ विधान

सोलापूरहून अक्कलकोट तालुक्यातील सांगवी खूर्द येथील नैसर्गिक आपत्तीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी करून गावकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. नंतर रामपूर येथे अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची व शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी करतील. बोरी उमरगे येथील पाहाणी केल्यानंतर मुखमंत्री सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात पूर परिस्थितीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करतील. तसेच अभ्यागताच्या भेटी घेतील. सायंकाळी सोलापूरहून विमानानं मुंबईकडे रवाना होतील.

वाचा :- गॅस सिलेंडर घरपोहच मिळणार नाही; जाणून घ्या नवे निअम व अटी!

वाचा :- ‘या’ कारणामुळे कंगनावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल!