क्रीडा

भारताचा ‘हा’ खेळाडू कोरोनाची लसही बनवू शकतो

वीरू ट्विटमुळे पुन्हा चर्चेत!

17 Oct :- भारताचा स्फोटक फलंदाज माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग हा त्याच्या ट्विटमुळे कायमच चर्चेत असतो. अनेकवेळा सेहवाग त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन खेळाडूंना किंवा टीमना ट्रोल करताना दिसतो, पण IPL च्या राजस्थान आणि बँगलोरच्या मॅचमध्ये सेहवागनं राहुल तेवतियाचं मनभरून कौतुक केलं आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

राहुल तेवतिया काहीही करु शकतो, असं ट्विट सेहवागनं केलं आहे. बँगलोरविरुद्धच्या मॅचमध्ये राहुल तेवतियाने विराट कोहलीचा अफलातून कॅच घेतला. कार्तिक त्यागीच्या बॉलिंगवर 14व्या ओव्हरमध्ये विराटने मिड विकेटच्या दिशेने बॉल मारला, पण सीमारेषेवर तेवतिया उभा होता. विराटचा कॅच पकडत असताना तेवतियाचा तोल सुटला आणि तो सीमरेषेच्या पलीकडे जात होता, तेवढ्यात त्याने हातातला बॉल उडवला.

वाचा :- ठाकरे सरकारने केली मोठी घोषणा; दसऱ्यापासून ‘हे’ सुरु होणार

सीमारेषा ओलांडल्यावर तेवतिया पुन्हा मैदानात आला आणि त्याने कॅच पकडला. ‘तेवतिया काहीही करू शकतो. सध्याचा त्याचा फॉर्म बघता, त्याला संधी दिली तर तो कोरोनावरची लसही बनवेल,’ असं ट्विट सेहवागने केलं आहे. या ट्विटसोबत सेहवागने तेवतियाच्या त्या कॅचचा फोटोही जोडला आहे.

वाचा :- गॅस सिलेंडर घरपोहच मिळणार नाही; जाणून घ्या नवे निअम व अटी!

वाचा :- ‘या’ भारतीय वेगवान गोलंदाजास कोरोनाची लागण; IPL मधून बाहेर