सिनेमा,मनोरंजन

‘या’ कारणामुळे कंगनावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल!

राजद्रोहासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल

17 Oct :- हिंदी चित्रपटातील लोकप्रिय आणि आघाडीची अभिनेत्री कंगना रणौत आपल्या सडेतोड आणि बिनधास्त वक्तव्यामुळे कायम चर्चेचा विषय बनते. अनेकदा कंगनाला मोठ्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागले आहे. मात्र यावेळी आता कंगना आपल्या बिनधास्त स्वभावामुळे मोठ्या संकटात सापडली आहे. हिंदू आणि मुस्लिम या दोन समुदायांमध्ये परस्परांविषयी द्वेष निर्माण होईल आणि जातीय सलोखा बिघडेल, अशा हेतुने वारंवार ट्वीट केल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत अडचणीत सापडली आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

वांद्रे न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांनी कंगना रणौत हिच्यासह तिच्या बहिणीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी याबाबत माहिती दिली आहे. कंगना आणि तिची बहीण रंगोली चंडेल हिच्यावर दोन समाजात तेढ निर्माण करणे, धार्मिक द्वेष पसरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात एक याचिकाही दाखल करण्यात आली होती.

वाचा :- ठाकरे सरकारने केली मोठी घोषणा; दसऱ्यापासून ‘हे’ सुरु होणार

कंगना विरोधात दाखल केलेल्या एका याचिकेमध्ये याचिकाकर्त्यानं असं म्हटलं आहे की, हिंदू कलाकार आणि मुस्लिम कलाकार यांच्यात मतभेद निर्माण करत कंगनाने तिच्या ट्वीट आणि न्यूज चॅनेल्सवरील तिच्या वक्तव्यामधून द्वेष वाढवला आहे. कंगना विरोधात दाखल केलेल्या एका याचिकेमध्ये याचिकाकर्त्यानं असं म्हटलं आहे की, हिंदू कलाकार आणि मुस्लिम कलाकार यांच्यात मतभेद निर्माण करत कंगनाने तिच्या ट्वीट आणि न्यूज चॅनेल्सवरील तिच्या वक्तव्यामधून द्वेष वाढवला आहे.

वाचा :- शाळा सुरु करण्याबाबत उपमुख्यमंत्र्यांनी केले ‘हे’ विधान

अभिनेत्री कंगना रणौत व रंगोली चंडेल यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याचे निर्देश वांद्रे न्यायदंडाधिकारी न्यायालयानं मुंबई पोलिसांना शनिवारी दिले होते. त्या आदेशानुसार कंगना व रंगोलीविरोधात वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 124 (अ) राजद्रोहासह विविध कलमांखाली कंगनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी आता वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने अभिनेत्रीविरोधात एफआयआर दाखल करण्याचा निर्णय दिला आहे.

वाचा :- गॅस सिलेंडर घरपोहच मिळणार नाही; जाणून घ्या नवे निअम व अटी!

कंगनाविरोधात भादवी कलम 153(A), 295(A), 124, 34 IPC अंतर्गत FIR दाखल केली जाणार आहे. याप्रकरणी अभिनेत्रीची काय प्रतिक्रिया असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.अभिनेत्री कंगना रणौत व रंगोली चंडेल यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याचे निर्देश वांद्रे न्यायदंडाधिकारी न्यायालयानं मुंबई पोलिसांना शनिवारी दिले होते. त्या आदेशानुसार कंगना व रंगोलीविरोधात वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचा :- ‘या’ भारतीय वेगवान गोलंदाजास कोरोनाची लागण; IPL मधून बाहेर

124 (अ) राजद्रोहासह विविध कलमांखाली कंगनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी आता वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने अभिनेत्रीविरोधात एफआयआर दाखल करण्याचा निर्णय दिला आहे. कंगनाविरोधात भादवी कलम 153(A), 295(A), 124, 34 IPC अंतर्गत FIR दाखल केली जाणार आहे. याप्रकरणी अभिनेत्रीची काय प्रतिक्रिया असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

वाचा :-कोरोनाला थोपवण्यासाठी ‘WHO’ ने दिले ‘हे’ 4 महत्वपूर्ण सल्ले!

वाचा :- संशोधकांच्या प्रयत्नांना मोठा धक्का; ‘या’ 3 लसींची चाचणी थांबवली