क्रीडा

‘या’ भारतीय वेगवान गोलंदाजास कोरोनाची लागण; IPL मधून बाहेर

भारतीय क्रिकेटमध्येही कोरोना विषाणूचा शिरकाव

17 Oct :- जवळपास सर्वच कोरोना विषाणूचा शिरकाव झाला आहे. तंदुरुस्त आणि फीट असणारे क्रिकेट क्षेत्र सुद्धा कोरोना विषाणूपासून वाचू शकले नाही. आता भारतीय क्रिकेटमध्येही कोरोना विषाणूने शिरकाव केला आहे. भारतीय महिला संघाची वेगवान गोलंदाज मानसी जोशीला सुद्धा कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मानसी जोशी पुढच्या महिन्यात युएईमध्ये होणाऱ्या महिला टी-20 चॅलेंजरमध्ये खेळणार नाही. आणि IPL ला सुद्धा मुकावे लागणार आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

बीसीसीआय ने काहीच दिवसांपूर्वी महिला IPL च्या ३ टीमची घोषणा केली होती. महिला IPL मध्ये मिताली राज, स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत कौर व्हेलॉसिटी, ट्रायब्लर्स आणि सुपरनोवासच्या टीमचं नेतृत्व करणार आहेत. 4 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर या कालावधीमध्ये महिला आयपीएल युएईमध्ये खेळवण्यात येणार आहे.

वाचा :- ठाकरे सरकारने केली मोठी घोषणा; दसऱ्यापासून ‘हे’ सुरु होणार

ईएसपीएन क्रिकइन्फोच्या अहवालानुसार 27 वर्षांच्या मानसीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मानसी सध्या देहरादूनमध्ये क्वारंटाईन आहे, त्यामुळे ती मुंबईला गेलेली नाही. महिला IPL मध्ये भाग घेण्यासाठी भारतीय खेळाडू 13 ऑक्टोबरलाच मुंबईमध्ये पोहोचल्या आहेत.

वाचा :- ठाकरे सरकारने केली मोठी घोषणा; दसऱ्यापासून ‘हे’ सुरु होणार

मानसी जोशीऐवजी मिताली राजच्या व्हेलॉसिटी टीममध्ये 26 वर्षांची वेगवान गोलंदाज मेघना सिंगला घेण्यात आलं आहे. मानसीने 2016 साली पदार्पण केल्यानंतर 11 वनडे आणि 8 टी-20 मॅचमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे.

वाचा :- शाळा सुरु करण्याबाबत उपमुख्यमंत्र्यांनी केले ‘हे’ विधान

वाचा :- गॅस सिलेंडर घरपोहच मिळणार नाही; जाणून घ्या नवे निअम व अटी!