राजकारण

शाळा सुरु करण्याबाबत उपमुख्यमंत्र्यांनी केले ‘हे’ विधान

कोरोनाच्या प्रादुर्भावा पासून वाचण्यासाठी जबाबदारीने वागा- अजित दादा

17 Oct :- कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात सर्वत्र अनलॉक चे सत्र सुरु आहे. अनलॉक ५ मध्ये हळूहळू दक्षता घेत सर्व काही सुरु करण्यात आले आहे. आता सर्वांना सध्या प्रश्न पडलेला आहे तो म्हणजे शाळा, महविद्यालय कधी सुरु होणार? राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना शाळा कधी सुरु होणार प्रश्न विचारला असता अजित दादांनी उत्तर दिले की दिवाळीपर्यंत शाळा सुरू होऊ शकत नाही.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याचा आढावा घेण्यात येईल, दिवाळीआधी शाळा सुरू होणार नाहीत, असे अजित पवार यांनी सांगितले.ते ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात बोलत होते. ते म्हणालेत – ‘पुण्याचा निर्धार, कोरोना हद्दपार’ या मोहिमेला पुणेकरांनी साथ द्यावी. अजित पवारांच्या हस्ते पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक किटचे वाटप करण्यात आले.

वाचा :- गॅस सिलेंडर घरपोहच मिळणार नाही; जाणून घ्या नवे निअम व अटी!

शाळा सुरु करण्याबाबत दिवाळीनंतर परिस्थिती पाहून निर्णय घेऊ. दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याचा आढावा घेण्यात येईल, दिवाळीआधी शाळा सुरू होणार नाहीत, असे ते म्हणालेत.अजित पवार यांनी सांगितलं की, आपण कोरोना महामारीच्या संकटातून आपण जात आहोत. मध्यंतरी ‘सोशल डिस्टंसिंग’कडे दुर्लक्ष झाले. त्याचा परिणाम पुणेकरांनी भोगला आहे.

वाचा :-कोरोनाला थोपवण्यासाठी ‘WHO’ ने दिले ‘हे’ 4 महत्वपूर्ण सल्ले!

सुरुवातीला लोक कोरोना झाल्याचे सांगायला घाबरायचे. आता परिस्थिती बदलते आहे.पुण्यात डिसेंबर, जानेवारीत दुसरी लाट येऊ शकते, हा अंदाज खोटा ठरवण्यासाठी जबाबदारीने वागा, असे आवाहन अजित पवार यांनी केले. यावरून अद्याप तरी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होई पर्यंत राज्य सरकार शाळा सुरु करण्याच्या तयार नसल्याचे संकेत मिळत आहेत.

वाचा :- संशोधकांच्या प्रयत्नांना मोठा धक्का; ‘या’ 3 लसींची चाचणी थांबवली

वाचा :- महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करता येणार नाही – सुप्रीम कोर्ट