बीड

पोदार स्कूलचे प्रा.कोटवाणी “डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्कराने सन्मानित!

बीडच्या शिरपेचात मनाचा तुरा

16 Oct अल्पदिवसांत नावारूपाला आलेले बीड शहरातील पोदार इंटरनॅशनल स्कूलचे नवनिर्वाचित प्राचार्य बी.डी. कोटवाणी यांनी गेल्या २२ वर्षात भारत देशातील शिक्षण क्षेत्रात दिलेले उल्लेखनीय योगदानाचे सर्वत्र कौतुक होत असताना त्यांच्या या कार्याची पावती म्हणून संपूर्ण आशिया खंडात कार्यरत असणारे भारतातील नामवंत श्री कृष्ण एडुकेअर या संस्थेने प्राचार्य बी.डी. कोटवाणी सर यांना “डॉ. एपीजे अब्दुल कलाम’ पुरस्कराने सन्मानित आले आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

1999 पासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या प्राचार्य बी. डी. कोटवाणी यांचा शिक्षण क्षेत्रात २२ वर्षांचा मोठा अनुभव आहे. गुजरात, हिमाचल, राजस्थान येथील मोठ्या शिक्षण संस्थांबरोबर सलग्न होऊन प्राचार्य बी. डी. कोटवाणी यांनी शिक्षण क्षेत्रात स्वतःला सक्षमरित्या सिद्ध केले आहे. आणि आता सध्या भारतातील शिक्षण क्षेत्रामध्ये विश्वसनीय आणि नामवंत असणारे पोदार ग्रुपस ऑफ स्कूलमध्ये प्राचार्य बी. डी. कोटवानी कार्यरत आहेत. या पुरस्कार या अगोदरही प्राचार्य बी. डी. कोटवाणी सरांना विद्यार्थी विकास समिती,उज्जैन च्या वतीने ५ सप्टेंबर २०१७ रोजी ‘राष्ट्रीय शिक्षक सन्मान’ या पुरस्कारने गौरविण्यात आले आहे. तर २०१९ मध्ये गुजरात येथील अवंतिका ग्रुप्सच्या वतीने ‘डॉ. ए पी जे अब्दूल कलाम’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

वाचा :- शाळांबाबत राज्य सरकारने घेतला ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय

संपूर्ण आशिया खंडात कार्यरत असणारे भारतातील नामवंत श्री कृष्ण एडुकेअर संस्थेने प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी शैक्षणिक क्षेत्रातील 468 लोकांचे नामनिर्देशन मागवले होते. फक्त भारतच नाहीतर इतरत देशातूनही या पुरस्करासाठी नामनिर्देशन आले होते. यापैकी या पुरस्कारासाठी 260 गुणवंतांची निवड करण्यात आली. त्यापैकी बीड शहरातील पोदार इंटरनॅशनल स्कूलचे नवनिर्वाचित प्राचार्य बी.डी. कोटवाणी यांना “डॉ. एपीजे अब्दुल कलाम’ पुरस्कराने गौरविण्यात आले आहे.

वाचा :- बीड जिल्हाधिकाऱ्यांनी काढला नवा आदेश!

प्राचार्य बी.डी कोटवाणी सर बीड येथील पोदार स्कूलमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कार्यरत आहेत. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यावर्षी शाळा बंद आहेत.आशा या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पोदार शाळेने ऑनलाईनच्या माध्यमातून मुलांना शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. प्राचार्य बी.डी कोटवानी यांच्या मार्गदर्शनाखाली पोदार शाळेमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून ऑनलाईनच्या माध्यमातून मुलं व्यवस्थितपणे शिक्षण घेत असून पोदार शाळेमध्ये मुलांसाठी ऑनलाईनच्या माध्यमातून ऑनलाईन योग दिन, शिक्षक दिन, क्रीडा दिवस, टीचर्स इन्व्हेस्ट सरेमनी, बहादूरलाल शास्त्री यांची जयंती, गांधी जयंती अशी अनेक मोठी सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा घेण्यात आली आहेत.

वाचा :- जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले बीडकरांना ‘विशेष’ आवाहन!

सध्या बीड शिक्षण क्षेत्रात प्राचार्य बी. डी. कोटवाणी नवनिर्वाचित आहेत. मात्र येणाऱ्या काळात नक्कीच बीड शिक्षण क्षेत्रात सुद्धा त्यांची उल्लेखनीय कामगिरी दिसेल असा विश्वास विद्यार्थ्यांमध्ये पालकांमध्ये, आणि शिक्षकांमध्ये निर्माण झाला आहे.

वाचा :- कोरोना लसीच्या वितरणाविषयी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी केला खुलासा!