संशोधकांच्या प्रयत्नांना मोठा धक्का; ‘या’ 3 लसींची चाचणी थांबवली
सुरक्षेच्या कारणास्तव चाचण्या बंद केल्या
16 Oct :- सध्या जगभरात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असताना सर्व जगाची कोरोना लस कधी येईल याच्यावर नजर आहे. जगभरात कोरोना लशींवर काम सुरु असून अजून शास्त्रज्ञ त्याच्यावर संशोधन करत आहेत. पण आता या संशोधकांच्या प्रयत्नांना या आठवड्यात मोठा धक्का बसला आहे. जॉन्सन अॅण्ड जॉन्सन या अमेरिकी कंपनीने आपल्या कोरोना विषाणूच्या लसीची चाचणी थांबवली.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
एली लिलीनेही कोरोनावरील लशीवर सुरू असलेले संशोधन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी, ब्रिटनची फार्मा कंपनी अॅस्ट्राझेनेका हिने दोन स्वयंसेवक आजारी पडल्याने कोरोना लसीची तिसरी चाचणी थांबवली होती. मात्र, नंतर काही दिवसांनीच अॅस्ट्राझेनेकाने लसीवरील काम सुरु केले होते.पण कोरोनावरील या मुख्य तीन कंपन्यांचे लशींवरील काम जरी बंद असले तरी ती एक चांगली बाब असल्याचे मानलं जात आहे. कारण संशोधक लशींबद्दल सेफ्टी प्रोटोकॉल्सचे पालन करताना दिसत आहे.अमेरिकी कंपन्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव चाचण्या बंद केल्या असल्या तरी, त्यांनी सर्व माहिती याबद्दलची सर्व माहिती सांगितली नाही.
वाचा :- सचिन तेंडुलकरचा जावई ‘हा’ भारतीय खेळाडू!
लसीची चाचणी मधूनच थांबवणे ही तशी नवीन गोष्ट नाही. पण एली लिलीच्या अँटीबॉडी ड्रग्जची चाचणी थांबवणे थोडी विरळ बाब असून तज्ज्ञांनी याबद्दल चिंताही व्यक्त केली आहे. ही कंपनी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रुग्णांची चाचणी करत होती. आधीच आजारी असलेल्या लोकांचे आरोग्य खालावले म्हणजे ती एवढी चिंताजनक गोष्ट नाही. पण अशा पध्दतीने चाचण्या थांबवण्यामागे सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला असेल असे सांगितले जात आहे. चाचणी थांबवण्याचे कारणाबद्दल कंपन्या फारसे बोलत नाहीयेत. सप्टेंबर महिन्यात अॅस्ट्राझेनेकाने फक्त एवढेच म्हटले की त्याच्या एका स्वयंसेवकाला एक रोग होता जो स्पष्ट नव्हता. पण नंतर असे सांगण्यात आले की दोन स्वयंसेवकांना एकाच प्रकारचा आजार होता. दोघांच्याही पाठीच्या कण्यात दुखू लागले होते.
वाचा :- महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करता येणार नाही – सुप्रीम कोर्ट
जॉन्सन अॅण्ड जॉन्सनने म्हटले होते की माहित नसणाऱ्या रोगामुळे आपण लसीची चाचणी थांबवत आहोत. एली लिलीचे शरीरविरोधी उपचार रोखण्यात आले कारण दोन्ही गटांच्या आरोग्यात फरक होता ज्याला औषध देण्यात आले होते आणि ज्याला प्लासिबो मिळाला होता. मात्र, कंपनीने ही माहिती सादर केलेली नाही.शेवटच्या टप्प्यात स्वयंसेवक सहभागी होतात तेव्हा त्यांच्यापैकी काहींना प्लेसिबोही मिळतो. ही चाचणी रँडमाइज्ड आणि डबल ब्लाइंड असते, ज्यामध्ये लस किंवा प्लासिबो कोणत्या क्रमाने द्यायची हे निश्चित केली जात नाही. त्याला काय देण्यात आले आहे हे डॉक्टरांना किंवा स्वयंसेवकालाही माहीत नसते.
वाचा :- गिरीश महाजनांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा आरोपी अटक
पुढील काही आठवडे त्यांच्यावर नजर ठेवली जाते. लसीच्या चाचणीत सहभागी असलेल्या लोकांची दर महिन्याला तपासणी केली जाते आणि लक्षणे जर्नलमध्ये नोंदवली जातात.डोकेदुखी, तापासारख्या सौम्य लक्षणांमुळे लसीची चाचणी थांबत नाही. गंभीर समस्या असेल तरच संशोधक चाचणी थांबवतात. मग याची माहिती रिसर्च कंपनीला दिली जाते. नंतर संशोधनासाठीचा स्पॉन्सरला अन्न व औषध प्रशासनाला माहिती द्यावी लागते. याव्यतिरिक्त, डेटा आणि सेफ्टी मॉनिटरिंग बोर्डाचे सदस्य असलेल्या स्वतंत्र सल्लागारांनाही याची माहिती द्यावी लागते. जर बोर्ड किंवा कंपनीने समस्या मोठी आहे असे ठरवले तर ते चाचणी थांबवू शकतात.
वाचा :- PUBG खेळण्यासाठी मोबाईल न देणाऱ्या बापाचा चिरला गळा
वाचा :- घरात घुसून तरुणीवर केला बलात्कार