PUBG खेळण्यासाठी मोबाईल न देणाऱ्या बापाचा चिरला गळा
स्वतःत्या गळ्यावरही फिरवला सुरा
16 Oct :- दिवसरात्र मोबाईलमध्ये हरवलेली आजकालची पीडी नात्यांना देखील विसरू लागली आहे. मोबाईलच्या आता वापरामुळे अनेक दुष्परिणामांना सामोरे जावे लागत असताना सुद्धा आजकालची मुलं मोबाईल पासून दूर राहू शकत नाहीत. आजकालच्या पीडीमध्ये सर्वात जास्त क्रेज असलेला PUBG गेममुळे अनेक विचित्र घटना घडत आहेत. अशीच एक विचित्र धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात मेरठमध्ये घडली आहे.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
PUBG खेळण्यासाठी मोबाईल दिला नाही म्हणून मुलाने रंगाच्या भरात थेट जन्मदात्या बापाचाच गळा चिरला आहे. एवढ्यावरच त्या मुलाचा राग शांत नाही झाला त्यानंतर स्वतःत्या गळ्यावरही सुरा फिरवला. दोघांचीही प्रकृती आता अत्यंत गंभीर आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. जमुना नगरच्या एवन कॉलनीत राहणारा 25 वर्षीय आमिर पब्जी गेमच्या व्यसनात पार वेडा झालेला होता.
वाचा :- घरात घुसून तरुणीवर केला बलात्कार
आमिरने आपले वडील इरफान यांच्याकडे पब्जी खेळण्यासाछी मोबाइल मागितला. मात्र इरफान यांनी त्याला मोबाईल देण्यास नकार दिला. त्यानंतर आमिरचा राग शिगेला पोहचला. तो रागारागात आपल्या खोली गेला आणि तिथून हातात सुरा घेऊन बाहेर आला. आधी त्याने आपल्या वडीलांचा गळा चिरला, त्यानंतर पायावरही सुऱ्याने वार केले. इथंच तो थांबला नाही तर त्याने आपल्या गळ्यावरही चाकू फिरवला. दोघंही रक्तबंबाळ होऊन जमिनीवर पडले होते.
वाचा :- सचिन तेंडुलकरचा जावई ‘हा’ भारतीय खेळाडू!
बाप- लेक दोघंही मोठ्याने जीव वाचवण्यासाठी ओरडू लागले. त्यांचा आरडाओरडा ऐकून लोक धावत आले. दोघांनीही एमसीसी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. दोघांचीही प्रकृती गंभीर आहे, मात्र आमिरची प्रकृती खूप नाजूक असल्याचं सांगितलं जातं आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
वाचा :- शाळांबाबत राज्य सरकारने घेतला ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय