महाराष्ट्र

महाराष्ट्राचे आजचे कोरोना अपडेट!

रुग्णवाढीत समाधानकारक घट कायम

15 Oct :- राज्यात कोरोना विषाणूचा कहर गेल्या काही दिवसांपासून रुग्णवाढ आटोक्यात येत असल्याची समाधानकारक आकडेवारी समोर येत आहे. आजही काही प्रमाणात सर्वांच्या मनाला दिलासा देणारी माहिती समोर आली आहे.कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसू येत आहे.मात्र आज रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिलासा देणारे आहे. तरी रुग्णवाढ मात्र चिंताजनकच आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ उतार होत आहेत. मात्र मृत्यूची संख्या कमी होत नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या तीन दिवसांपासून राज्यातल्या कोविड रुग्णांच्या मृत्यू संख्येत घट झाली होती. गुरूवारी त्यात पुन्हा वाढ झाली दिवसभरात 337 रुग्णांचा मृत्यू झाला. आज 13 हजार 714रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

वाचा :- घरात घुसून तरुणीवर केला बलात्कार

कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या त्यामुळे 13 लाख 30 हजार 483 एवढी झाली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 85.4 टक्के एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर 2.60 टक्के एवढा आहे.दिवसभरात राज्यात 10 हजार 226 नवीन रुग्णांचे निदान झालं आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 79 लाख 14 हजार 651प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 15 लाख 64 हजार 615 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 92 हजार 459 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

वाचा :- सचिन तेंडुलकरचा जावई ‘हा’ भारतीय खेळाडू!

वाचा :- शाळांबाबत राज्य सरकारने घेतला ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय