महाराष्ट्र

घरात घुसून तरुणीवर केला बलात्कार

अहमदनगर येथील नेवासा तालुक्यात घडली घटना!

15 Oct :- समाजामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रामण वाढताना दिसत आहे. एकापाठोपाठ महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना समोर येत असल्याने समाजामध्ये संतापाचे आणि तणावाचे वातावरण निर्माण होत आहे. नुकतीच अहमदनगर येथील नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा परिसरात राहणाऱ्या एका ३० वर्षांच्या तरुणीवर घरात घुसून तिला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

या पीडित तरुणीवर ऑगस्ट २०२० ते सप्टेंबर २०२० या काळात आरोपी गोरख काळे याने लग्नाचे आमिष दाखवून बळजबरीने केला तर आरोपी नामदेव काळे, केलास सुकळकर, या दोघांनी पिडीत तरुणीच्या परिवाराला धमकी देऊन मारहाण केली, तसेच मोबाईलवर मेसेज करून धमक्या देत आहे. आरोपी क्र.कैलास सुकळकर याने आरोपी १ गोरक्ष काळे याला साथ दिली आहे.

वाचा :- सचिन तेंडुलकरचा जावई ‘हा’ भारतीय खेळाडू!

या घटनेने वडाळा बहिरोबा परिसरासह नेवासा तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान पिडीत तरुणीने या प्रकरणी काल श्रीशनिशिंगणापूर पोलिसात फिर्याद दिल्यावरुन आरोपी गोरख काळे, नामदेव काळे, कैलास सुकळकर तिघे रा. वाटापूर, ता. नेवासा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक भोये यांनी घटनास्थळी भेट दिली असून या प्रकरणाचा पुढील लपास स्वत: भोये हे करीत आहेत.

वाचा :- असंतुलित झाल्याने बाबा रामदेव जमिनीवर कोसळले

वाचा :- ‘मी कुणालाही किस करू शकतो’- ट्रम्प