बीड जिल्हाधिकाऱ्यांनी काढला नवा आदेश!
व्यवसायिकांना मोठा दिलासा!
14 Oct :- कोविड-१९ चा कहर हळहळू कमी होत असल्याने सर्वसामान्यांना हव्या असणाऱ्या सुविधा मिळण्यास सुरुवात झाली आहे. बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दि. १४ ऑक्टोबर रोजी नवीन आदेश काढताना जिल्हयातीलस्व परवानी असणाऱ्या व्यवसाय/दुकान व इतर बाबींना रात्री ९ वाजेपर्यंत कामकाज करता येणार असल्याचे सांगितले आहे. याचाच अर्थ आता बाजारपेठा सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत उघड्या राहणार आहेत.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
जिल्हाधिकारी रेखावार यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, दि. १५ ऑक्टोबर पासून कन्टेनमेंटझोन क्षेत्राबाहेर स्थानिक आठवडी बाजार (जनावरांचे देखील) सुरुकरण्यास परवानगी राहिल.तसेच जिल्ह्यातौल सर्व व्यवसाय/दुकान व इतर बाबींना रात्री ९ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे.
वाचा :- जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले बीडकरांना ‘विशेष’ आवाहन!
तसेच ही परवानगी देताना जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, या सर्व दुकानात वावरणाऱ्या सर्व व्यक्तींना पुर्ण वेळ मास्क, सॅनीटायझर व सुरक्षीत अंतर हे कोविड -१९ चे सर्व बंधने पाळणे आवश्यक राहणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या नवीन आदेशाने व्यावसायिक दुकानदारांना मोठा दिलासा मिळाला असून यामुळे आर्थिक उलाढालींना गती मिळणार आहे.